spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खापा नगर परिषद, नामांकन पहिला दिवस कोरडा, उमेदवार निरुत्साही, एकही नामांकन दाखल नाही

खापा :- आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोमवार, १० नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. मात्र आजच्या पहिल्या दिवशी शहरातील दहा प्रभागातील प्रत्येकी दोन असे वीस नगरसेवक आणि एक अध्यक्ष पैकी एकाही प्रभागातून नगरसेवक आणि शहरातून अध्यक्ष पदासाठी कुणीच उमेदवारी (नामांकन) दाखल केली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी सोमवारी दिवसभर कार्यालयात तळ ठोकून होते. इच्छुक उमेदवारांनी केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संपर्क साधून संगणकीय नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती घेतली.

नगरपालिकेच्या नगरसेवक २० पदासाठी तर एक अध्यक्ष पदासाठी १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर पर्यंत नामांकन अर्ज दाखल करता येणार आहेत. नामांकन अर्ज दाखल करण्याचा पहिला दिवस कोरडा गेला. दरम्यान, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर स्नेहलता पाटील, तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी नगर परिषद खापा किरण बगडे म्हणून काम सांभाळत आहे.

दरम्यान सर्व उमेदवारीसाठी अर्ज प्रक्रिया ही प्रथमतः ऑनलाइन पद्धतीची असल्यामुळे उमेदवारांनी ऑनलाईन अर्जही दाखल केले नाहीत. तसेच ऑनलाईन प्रक्रिया असल्यामुळे नगरपालिकेतून कसल्याही नामांकन अर्जाची खरेदी अथवा विक्री झालेली नाही. आगामी १७ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्जांची दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.