खापा :- आगामी नगर परिषद निवडणूकिची आचार संहिता लागु होताच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खापा पोलिसांनी गुरुवार दि. १३ नोव्हेंबर रोजी रूट मार्च केला. निवडणुकीत कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी खापा पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. त्यासाठी तगडा पोलिस बंदोबस्त राहणार आहे.
नागपुर पोलिस अधिक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी सावनेर पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात व खापा पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या रूट मार्चमध्ये पोलिस उपनिरीक्षक नासरे, पीएसआय सचिन जंगम, पीएसआय जगदीश पालीवाल, पी एस आय चव्हाण, ए एस आय नारायण बोरकर, पो. शी. नितेश चिपडे, राहुल रेवतकर, परवेज शेख, विशाल महालकर, विकास बेलसरे, संतोष परतेती, खामेश्वर बांबल, प्रकाश नांदुरकर, संजय दशमवार, श्याम सोळंकी, सनातलाल मरकाम, पूर्णिमा चित्तारी यांच्यासह पोलीस स्टेशन खापा येथील स्टाफसह

“कायदा व सुव्यवस्थेचा पालन करा, जातीय, समाजिक तेढ निर्माण केल्यास कारवाई, ठाणेदार किशोर भुजाडे” :- कायदा सुव्यवस्थेचा पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे. कोणीही जातीय व सामाजिक तेढ निर्माण करणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यावी. जर कोणीही असे कृत्य करत असेल तसेच सोशल मीडियावर एखादा मेसेज येत असेल व त्या मेसेजला एडिटिंग, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर लाऊन कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न करत असेल तर नागरिकांनी त्वरित पोलीस हेल्पलाइन नंबर वर संपर्क साधावा. नागरिकांनी कोणत्याही मोहाला बळी न पडता, कायद्याचे पालन करत, कोणत्याही प्रकारचे कायद्याचे उलंघन न करता, बिनधास्त १०० टक्के मतदान करावे. तसेच नगरपरिषद निवडणूक दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन खापा पोलिस ठाण्याचे ठाणेदार किशोर भुजाडे यांनी केले.








