– बसपाच्या प्रदेशाध्यक्ष ॲड.सुनील डोंगरे यांचा निर्णय; पदाधिकाऱ्यांकडून गेडाम यांचे जोरदार स्वागत
कामठी :- बहुजन समाज पक्षाचे (बसपा) वरिष्ठ नेते किशोर गेडाम यांच्यावर करण्यात आलेले निष्कासन अवघ्या १५ दिवसांत रद्द करून त्यांची पुन्हा रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बसपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. सुनील डोंगरे यांनी हा निर्णय घेतला. गेडाम यांच्या पुनर्नियुक्तीमुळे पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक वर्तुळात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेडाम यांनी आपल्या पुनर्नियुक्तीबद्दल बसपाचे राज्य प्रभारी व माजी खासदार राजारामजी, प्रदेशाध्यक्ष अॅड. सुनील डोंगरे, प्रदेश सचिव विवेक हाडके, प्रफुल मानके, जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार तसेच रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे प्रभारी राजकुमार बोरकर यांचे आभार मानले.
दरम्यान, गेडाम यांची पुन्हा प्रभारीपदी नियुक्ती झाल्याचे वृत्त समोर येताच पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान, वाहतूक शाखाध्यक्ष आदिल भाई, नागपूर शहर युवा अध्यक्ष सुमित चव्हाण, कार्यालयीन सचिव अमित गजभिये, नागपूर शहर महिला अध्यक्ष शबीना खान, नागपूर शहर अध्यक्ष सुमित कुत्तरमारे, शहर महासचिव मंगेश नागदेवे, जितू हिवरकर, शहर सचिव अमित बनसोड, पश्चिम नागपूर अध्यक्ष सौरभ जामगडे यांनी गेडाम यांचे अभिनंदन केले.
याशिवाय कामठी विधानसभा क्षेत्राच्या प्रभारी सुनिता रंगारी, रामटेक विधानसभा अध्यक्ष राजेश फुलझेले, काटोल विधानसभा प्रभारी रूपराव नारनवरे, उमरेड विधानसभा अध्यक्ष मोटघरे, हिंगणा विधानसभा प्रभारी मानवटकर, सावनेर विधानसभा प्रभारी ताराबाई गोरखेडे आदी पदाधिकाऱ्यांनीही गेडाम यांच्या पुनर्नियुक्तीचे स्वागत केले.
पुनर्नियुक्तीमुळे संघटनात्मक हालचालींना वेग येण्याची शक्यता
किशोर गेडाम यांना पुन्हा रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राची जबाबदारी देण्यात आल्याने आगामी काळात बसपाच्या संघटनात्मक बांधणीला वेग येण्याची शक्यता आहे. विशेषतः रामटेक लोकसभा क्षेत्रातील पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधणे आणि पक्षाचा जनाधार मजबूत करण्याच्या दृष्टीने ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.





