spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गडेगाव शिवारात संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या इसमावर लाखनी पोलिसांची कारवाई

– रात्रीच्या अंधारात लपून बसलेला इसम ताब्यात; महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

हंसराज,प्रतिनिधी भंडारा लाखनी :- गडेगाव येथील एका पानठेल्याच्या मागे अंधारात स्वतःची ओळख लपवून, एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या एका इसमाला लाखनी पोलिसांनी अटक केली आहे. सुनील मनोहर बोंद्रे (रा. कवलेवाडा, ता. जि. भंडारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्च २०२६ रोजी रात्री १०:३० ते ११:१५ वाजताच्या सुमारास गडेगाव येथील ‘एम.पी.एस.सी. चाय पानठेला’ परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपी सुनील बोंद्रे हा सदर पानठेल्याच्या मागील आवारात अंधाराचा फायदा घेऊन लपून बसला होता. गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याची चौकशी केली असता, तो गुन्हेगारी उद्देशाने तिथे वावरत असल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकरणी पोलीस हवालदार मिलिंद पतीराम गभने यांनी दिलेल्या तक्रारीवरून, लाखनी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध अप. क्र. १०८/२०२६, कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात चोरी किंवा इतर गुन्हेगारी घटना रोखण्यासाठी पोलिसांनी आपले गस्त पथक सक्रिय केले असून, संशयास्पद हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवले जात आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही आपल्या परिसरात काही संशयास्पद आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार वच्छला चाचेरे या करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.