नागपूर :- महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रलंबित अपील व फेरफार प्रकरणे, पांदण रस्ते मोजणी व पट्टे वाटपाबाबत लोक अदालत आयोजित करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. त्या अुनषंगाने नागपूर जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामार्फत मंगळवार दि. 30 सप्टेंबर रोजी महसुली अपील प्रकरणासंबंधाने लोक अदालत जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नागपूर यांचे कार्यालय, तळमजला, खनिकर्म भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हील लाईन नागपूर येथे आयोजित केलेली आहे. या लोक अदालतीमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्याचे नियोजन केले आहे. तरी संबंधित सर्व नागरिकांनी या लोक अदालतीमध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अभय जोशी यांनी केले आहे.



