नागपूर :- जिल्ह्यातील भिवापूर, रामटेक व हिंगणा या तीन तालुक्यात प्रत्येकी एका गावाचे रुपांतर करण्यात आल्याची अंतिम अधिसूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जारी केली आहे. भिवापूर तालुक्यात मांडवा (लभान) यागावाची 2 गावामध्ये विभागणी करण्यात आली असून मांडवा (टोला) या नावाने नवीन गाव रुपांतरीत करण्यात आले. रामटेक तालुक्यात पथरई गावाची 2 गावामध्ये विभागणी करण्यात आली असून बंजारटोला या नावाने नवीन गाव रुपांतरीत करण्यात आले. हिंगणा तालुक्यात कटंगधरा गावाची 2 गावामध्ये विभागणी करण्यात आली असून नागाझरी या नावाने नवीन गाव रुपांतरीत करण्यात आले आहे.
या गावांची विभागणी करुन त्यांच्या सिमामध्ये बदल करण्यात आल्या आहेत. अनुसूची मध्ये दर्शविलेले भूमापन क्रमांक वगळता आणि या व्यतिरिक्त रस्ते नाले व नदी समाविष्ट असलेले स्थानिक क्षेत्र एक वेगळे गाव होणार असल्याचे अधिसूचनेत निर्देशित करण्यात आले आहे.
फाईल फोटो




