किशोर साहू, मौदा :- ग्रा पं मांगली (तेली) येथील ग्रा पं सदस्य व मौदा तालुका समन्वय समितीचे सदस्य लंकेश्वर डोरले यांना बाजार लिलाव कंत्राट प्रकरणात गावातीलच नागरीक कवडू चंद्रभान साठवणे, ग्रामपंचायत सचिव व गट विकास अधिकारी मौदा यांच्या तक्रारीवरून अप्पर जिल्हाधिकारी नागपूर यांनी 27 ऑक्टोंबर 2025 ला ग्रामपंचायत सदस्य लंकेश्वर डोरले यांना ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्र ठरविले होते. याबाबत डोरले यांनी अप्पर आयुक्त नागपूर विभाग नागपूर यांच्याकडे अपील दाखल केले होते.

सदर प्रकरणाची तपासणी व सुनावणी केल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेश अप्पर आयुक्त डॉ. माधवी खोडे चवरे यांनी 5 फेब्रुवारी 2026 ला फेटाळल्याने चार महिन्यानंतर डोरले यांना पुन्हा ग्रामपंचायत सदस्य बहाल करण्यात आले.
लंकेश्वर डोरले यांना पुन्हा ग्रामपंचायत सदस्य बहाल करण्यात आल्याने माजी आमदार टेकचंद सावरकर व डोरले यांच्या मित्र परिवाराने डोरले यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.




