spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

मुंबई :- फ्रान्सचे अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीसाठी काल रात्री मुंबई येथे आगमन झाले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल आचार्य देवव्रत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मॅक्रॉन तसेच त्यांच्या पत्नी ब्रिगिट यांचे स्वागत केले.

मंगळवारी (दि. 17) पंतप्रधान नरेंद्र मोदी व अध्यक्ष इम्यॅन्युएल मॅक्रॉन यांची महाराष्ट्र लोकभवन येथे महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मॅक्रॉन हे गेटवे ऑफ इंडिया येथे होत असलेल्या ‘इंडिया – फ्रांस यिअर ऑफ इनोव्हेशन अँड कल्चरल कमेमोरेशन’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

मॅक्रॉन यांच्या मुंबई आगमन प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.