कन्हान :- महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कन्हान शहर विकास मंच व सुपर केअर हॉस्पिटल, कामठी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनी गुरुवार १९ फेब्रुवारी २०२६ ला सकाळी ९.३० ते दुपारी ३ वाजे पर्यंत श्री हनुमान मंदिर, खदान रोड, गांधी चौक कांद्री येथे भव्य मोफत आरोग्य रोगनिदान शिबिर आयोजित केले आहे. ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, आजारांचे वेळेत निदान होऊन प्रतिबंधात्मक उपचाराची संधी मिळावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली.कांद्री, कन्हान, टेकाडी, खदान परिसरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. शिबिरात सामान्य रोग तपासणी सह ० ते १२ वर्षे वयोगटातील बालरोग तपासणी, दंत व मुखरोग तपासणी, नेत्र तपासणी, जनरल सर्जन व जनरल फिजिशियन यांचे मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे. तसेच रक्तदाब, शुगर, दमा, अस्थमा आदी आजा रांची तपासणीही करण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरां च्या मार्गदर्शनामुळे नागरिकांना आपल्या आरोग्या विषयी जागरूक होण्याची संधी मिळणार आहे.
कन्हान शहर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष ऋषभ बावनकर यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिरात सहभागी होऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी मो. नं. ९६३७१८५३३६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे ही त्यांनी सांगितले.




