Home Latest News शहराला देशाचे ग्रोथ इंजिन करण्यासाठी कटिबद्ध होऊ या स्वातंत्र्यदिनी मनपा आयुक्तांचा जनतेला...

शहराला देशाचे ग्रोथ इंजिन करण्यासाठी कटिबद्ध होऊ या स्वातंत्र्यदिनी मनपा आयुक्तांचा जनतेला संदेश : मनपात ध्वजारोहण

0

<p><strong>नागपूर&comma;ता&period; १६ &colon;<&sol;strong> नागपूर शहराचा जागतिक स्तरावर विकास करण्यासोबतच देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून ओळख मिळवून देण्याकरिता सक्षम&comma; लोकाभिमुख व कार्यक्षम धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी नागपूर महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>तंत्र्य दिनानिमित्त शुक्रवार १५ ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात ध्वजारोहण करण्यात आले&period; यावेळी मनपा अधिकारी&comma; कर्मचारी आणि नागरिकांना ते संबोधित करीत होते&period; प्रारंभी त्यांनी मनपाच्या अग्निशमन जवानांच्या परेडचे निरीक्षण केले व विभागाच्या जवानांच्या तीन तुकड्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली&period;<&sol;p>&NewLine;<p>कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी&period;&comma; अतिरिक्त आयुक्त अजय चारठाणकर&comma; मुख्य अभियंता  मनोज तालेवार&comma; उपायुक्त  विजया बनकर&comma; उपायुक्त  मिलिंद मेश्राम&comma; उपायुक्त गणेश राठोड&comma; उपायुक्त राजेश भगत&comma; उपायुक्त डॉ&period; रंजना लाडे&comma; उपायुक्त अशोक गराटे&comma; मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ&period; दीपक सेलोकर यांची प्रमुख उपस्थिती होती&period;<&sol;p>&NewLine;<p>उपस्थितांना मार्गदर्शन करताना मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी म्हणाले&comma; भारत देश आज जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे&period; लवकरच देश ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल&period; यात नागपूर शहराचे देखील योगदान असणार आहे&comma; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period; केंद्र आणि राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना मनपाद्वारे राबविण्यात येत आहेत&period; महानगरपालिका यावर्षी आपल्या स्थापनेचा अमृत महोत्सवही साजरा करीत आहे&period; गेल्या ७५ वर्षात नागपूर शहराचा विकास झाला आहे&period; यापुढेही विकास करण्यासाठी लोकांचे असे योगदान लाभेल&comma; असा विश्वास त्यांनी व्यक्त केला&period; शहरात पायाभूत सुविधा बळकट करण्यात येत आहे&period; त्याचप्रमाणे विविध सेवा व सुविधा पुरविण्यात येत आहे&period; या सुविधा ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी महानगरपालिकेचा प्रयत्न आहे&period; आरोग्य&comma; पाणी पुरवठा&comma; उद्याने&comma; अग्निशमन सेवा सक्षम व लोकाभिमुख करण्यासाठी आपला प्रयत्न आहे&period; नागपूर महानगरपालिका शहराची पालकसंस्था म्हणून विविध माध्यमातून नागरिकांना सेवा पुरविण्यास कटिबद्ध आहोत&comma; अशी ग्वाही देखील यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>प्रशासन अधिक गतीमान करण्यासाठी नागपूर २४५ जणांची भरती प्रक्रिया महानगरपालिकेने पूर्ण केली आहे&period; आपण नुकताच मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला १०० दिवसांच्या विकासाचे अभियान यशस्वीपणे राबविले आहे&period; यापुढे आता १५० दिवसाचा कार्यक्रम राबविण्यासाठी त्याची अंमलबजावणी करावयाची आहे&period; या सर्व योजना सक्षम&comma; लोकाभिमुख व अधिक कार्यक्षमपणे राबविण्यासाठी आपण सर्व जण स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने शपथ घेऊ या&comma; असे आवाहनही त्यांनी केले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी अतिरिक्त आयुक्त  अजय चारठाणकर यांनी नागपूर शहर एक वेगाने विकसित होणारे शहर असून&comma; देशाच्या विकासात या शहराचे महत्त्वाचे स्थान असल्याचे सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी मुख्य अग्निशमन अधिकारी  तुषार बाराहाते&comma; शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम&comma; मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ&period; गजेंद्र महल्ले&comma; सहायक आयुक्त  श्याम कापसे&comma; हरीश राऊत&comma; विजय थूल&comma; प्रमोद वानखेडे&comma; नरेंद्र बावनकर&comma;  स्नेहलता कुंभार&comma;  सतीश चौधरी&comma;  विकास रायबोले साप्रविचे अधीक्षक  राजकुमार मेश्राम&comma; उद्यान अधीक्षक  अमोल चौरपगार&comma; यांच्यासह इतर सर्व कार्यकारी अभियंता&comma; अधिकारी&comma; कर्मचारी आदी प्रामुख्याने उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपा आयुक्त डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी प्रारंभी मनपाच्या अग्निशमन जवानांच्या परेडचे निरीक्षण केले व विभागाच्या जवानांच्या तीन तुकड्यांनी दिलेली मानवंदना स्वीकारली&period; यावेळी अग्निशमन दलाचे  भगवान वाघ&comma;  दिलीप चौहान&comma; प्रकाश कवडकर यांनी तुकडीचे नेतृत्व केले&period; विशेष म्हणजे&comma; यावेळी अग्निशमन दलातील महिला जवानांनी परेड मध्ये सहभाग नोंदवीत मानवंदना दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>मनपाच्या तीन युपीएचसी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनात अव्वल<&sol;p>&NewLine;<p>केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येत असलेल्या राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनात अव्वल ठरलेल्या शहरातील ३ नागरी प्राथमिक केंद्रातील कर्मचाऱ्यांचा यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ&period; अभिजीत चौधरी&comma; अतिरिक्त आयुक्त  वैष्णवी बी&comma; व अतिरिक्त आयुक्त  अजय चारठाणकर यांच्या हस्ते मनपाचा मानाचा दुपट्टा&comma; सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला&period; यात नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ&period; अश्विनी हेडाऊ&comma; व अधिपरिचारिका  अर्चना हजारे&comma; मानेवाडा आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ&period; मीनल पटले व अधिपरिचारिका  रेणू कवाळे तसेच कपिल आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ&period; शकील अहमद व अधिपरिचारिका  कल्याणी शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला&period; तसेच मान्यवरांच्या हस्ते स्वच्छ भारत मिशन नागपूरचे ब्रँड अम्बेंसॅडर  कौस्तुभ चॅटर्जी व ग्रीन व्हिजिल च्या  सुरभी जैस्वाल&comma; उमेश चित्रीव&comma; श्रीमती आंचल वर्मा&comma;  रेषल भाटी यांचा संविधानाची प्रास्ताविका देऊन सत्कार करण्यात आला&period;कार्यक्रमाचे संचालन मनपाचे जनसंपर्क अधिकारी  मनीष सोनी व शुभांगी पोहरे यांनी केले&period; कार्यक्रमाचे आभार  मनीष सोनी यांनी मानले&period;<&sol;p>&NewLine;<p>दिव्यांगाच्या गीतांनी वातावरण देशभक्ती मय<&sol;p>&NewLine;<p>केंद्र व राज्य शासनाच्या हर घर तिरंगा २०२५ अंतर्गत स्वातंत्र्यदिनानिमित्त मनपा मुख्यालयात दिव्यांग बांधवांच्या गीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले&period; दिव्यांगाचे गायन स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात शहरातील दिव्यांगानी देशभक्तीचे गीते गायिली&period; यात  ईश्वरी पांडे&comma; शोएब शेख&comma; विजया कापकर&comma; धनंजय उपासने यांनी गीते गायिली&period; त्यांनी गायलेल्या गीतांनी संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले&period;  प्रकाश कालासिया आणि चमू यांनी राष्ट्रगीत सादर केले&period;<&sol;p>&NewLine;<p>जलपर्णी पासून तयार वस्तूंचे प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद<&sol;p>&NewLine;<p>नागपूर महानगरपालिका समाज विकास विभागाच्या कौशल्य विकास केंद्राने विकसित केलेल्या तलावातील पर्यावरणाला घातक अशा जलपर्णी वनस्पती पासून विविध गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन मनपा मुख्यालयात लावण्यात आले&period; &OpenCurlyQuote;व्होकल फॉर लोकल’ चा संदेश देत लावण्यात आलेल्या प्रदर्शनात टी कोस्टर&comma; टोपी&comma; हॅन्ड बॅग&comma; फाईल फोल्डर&comma; फ्रूट बास्केट&comma; कंटेनर&comma; स्मॉल बास्केट&comma; प्लँटर&comma; मॅट बॉक्स&comma; पाण्याची बॉटल बॅग&comma; योगा मॅट&comma; टिफिन बॅग आदी वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या होत्या&period; मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ&period; अभिजीत चौधरी यांनी या प्रदर्शनाचे अवलोकन केले व प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version