spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चला व्यसनाला बदनाम करूया – जनतेला अविनाश पाटीलांचे आवाहन

– “चला व्यसनाला बदनाम करू या”

नागपूर :- व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंचतर्फे १६ ते ३१ डिसेंबर दरम्यान “चला व्यसनाला बदनाम करू या” अभियान राबविले जाणार आहे. या अभियानातंर्गत नवीन वर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करणे, व्यसनाविरोधी पोर्स्टर, स्लोगन, शॉर्ट व्हिडिओ आदीच्या माध्यमातून व्यसनाला बदनाम केले जाणार आहे. तसेच ३१ डिसेंबरच्या पूर्व संध्येला म्हणजे ३० डिसेंबरला गोड दुधाचे वाटप करुन “द दारूचा नव्हे तर द दुधाचा” हा संदेश या माध्यमातुन देऊन अभियानाचा समारोप केला जाईल. अशी माहीती व्यसन मुक्त महाराष्र्ट समन्वय मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील व वर्षा विद्या विलास यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे. मंचाच्या वतीने गेली काही वर्षे नवीन वर्षाच्या स्वागताच्या अनुषंगाने “चला व्यसनाला बदनाम करू या”, असे अभियान राबवीत असतो. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणवर्ग व्यसनाकडे आकर्षिला जातो. व्यसन बद्दलच्या भुरऴ पाडणाऱ्या व आकर्षक जाहिराती, व्यसनांच्या दुष्परिणामांबद्दलची पुरेशी माहिती अभावी आणि दिवसेंदिवस व्यसनाला मिऴत असलेली प्रतिष्ठा, त्याचे खुले बाजारीकरण यामुऴे सामान्य माणूस त्यांस भुललेला आपल्याला दिसतो. म्हणून त्याचे दुष्परिणामांबाबत वास्तववादी रूप जनसामान्यांसमोर आणणे आवश्यक आहे. त्या करिता व्यसनाला बदनाम करावे लागेल. त्याचे खरे रूप सर्वांसमोर येण्यासाठी, अशा पद्धतीने प्रचार, प्रसार व प्रबोधनाची आवश्यकता आहे. या करिता दि. १६ ते ३१ डिसेंबरपर्यंत “चला व्यसनाला बदनाम करू”या नवीन वर्षाचे स्वागत धुंदीत नव्हे तर शुद्धीत साजरे करा, असे आवाहन या निमित्ताने करणार आहोत. त्याबाबतचे विविध पोष्टर्स, स्लोगन्स, शॉर्ट फिल्म लिंक इ. या सोबत सर्व सहभागींना पाठवीण्यात आले आहेत. हे अभियान यशस्वी करण्यासाठी अधिक लोकांना यांत सहभागी व्हावे, असे आवाहन मंचाचे राज्य निमंत्रक अविनाश पाटील व वर्षा विद्या विलास यांनी केले आहे.

आपण सर्व मिऴुन हे अभियान यशस्वी करू या! व्यसन मुक्त महाराष्ट्र समन्वय मंच तर्फे मंचावर अविनाश पाटील जगजीत सिंग गौरव आलणे आणि प्रदीप हिवाळे यांची उपस्थिती होती.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.