spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मानव सेवा गोरक्षणमध्ये लम्पी लसीकरण; आजारी जनावरांवरही उपचार

पांढरकवडा :- पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आकोली (बु.) येथील पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांच्या पथकाने पांढरकवडा येथुन तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या घनमोड येथील मानव सेवा गोरक्षण येथे लम्पी रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविली. यावेळी गोवंशाला लम्पी प्रतिबंधक लस देण्यात आली. तसेच जंतनाशक औषधांचे वितरण करून आजारी जनावरांवर आवश्यक उपचार करण्यात आले.

या मोहिमेत डॉ. वर्षा टाकळे, आकाश पवार व अमर झाडे यांनी सहभाग घेतला. याप्रसंगी मानव सेवा गोरक्षणचे अध्यक्ष गणेश अनमुलवार यांच्यासह सुरज बंडीवार, विशाल मग्गीडवार, नितीन बाराहते, निखिल बेले उपस्थित होते.

मानव सेवा गोरक्षण संस्थेत गोवंशाची नियमित वैद्यकीय तपासणी करून त्यांची उत्तम प्रकारे देखभाल केली जाते. निराधार व भटक्या गोवंशाच्या संगोपनासाठी संस्था सातत्याने कार्यरत असून, ज्यांना आपल्या घरी गाय पाळायची आहे अशा इच्छुकांना संस्थेमार्फत गाय उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. यामुळे निराधार गोवंशाला सुरक्षित आश्रय मिळण्याबरोबरच त्यांचे संगोपन करण्यासही प्रोत्साहन मिळत आहे.

Popular Articles