– महाप्रसादासाठी हजारो भाविकांची उपस्थिती
नागपूर :- शहरातील बेलदारनगर येथे आयोजित नऊ दिवसीय मां श्री बंगरममा देवी नवरात्रोत्सवाची घट विसर्जनाने भक्तिमय वातावरणात सांगता झाली. यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. देवीच्या दर्शनासाठी आणि महाप्रसादासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
नवरात्रोत्सवादरम्यान भजन, कीर्तन, जागरण तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांमध्ये स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
नवरात्रोत्सव यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. भाविकांच्या सहभागामुळे उत्सवाची सांगता उत्साहात झाली.








