spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन महाराष्ट्र दिवस साजरा

कन्हान :- सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्रा व्दारे शिवाजी नगर कन्हान येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला पुष्प हार अर्पण करित अभिवादन करून महाराष्ट्र दिवस साजरा करण्यात आला.

शुक्रवार (दि.१) मे २०२६ ला महाराष्ट्र दिवसा निमित्त सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्रा व्दारे कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी नगर कन्हान येथे कर ण्यात आले. कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित जेष्ठ नागरिक भरत सावळे, मुलचंद शिंदेकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी हिमांशु सावरकर यांनी शिवगर्जना प्रस्तुत केली. तसेच भरत सावळे, मुलचंद शिंदेकर यांनी महाराष्ट्र दिवसा निमित्त उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माँ यांचा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जेष्ठ नागरिक भरत सावळे, मुलचंद शिंदेकर, सनातनी धार्मिक संस्था कन्हान क्षेत्राचे प्रमुख शुभम बावनकर, आयुष संतापे, हिमांशु सावरकर, ऋषभ बावनकर, सिद्धार्थ पुंडे, मोहित, हितेश राजपुत, शंकर सुरुसे, जयराम तिडके, रविसिंग सोलंकी, विक्की सोलंकी, नलु रायपुरकर, मीरा तिडके, भारती सोलंकी, गीता सावळे, कुंदा वैद्य, कुंती टिकम सह नाग रिक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.