– कंत्राटदार विरहित रोजगार व समान काम, समान वेतन ठराव एकमताने मंजूर
– सुकेश गुर्वे यांची नागपूर झोन अध्यक्षपदी निवड. अभिजित माहुलकर झोन सचिव योगेश सायवानकर कोषाध्यक्ष, सागर साबळे संघटन मंत्री, मुकेश पाथ्रीकर कार्याध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदुर संघ यांचे नागपूर जिल्हा अधिवेशन उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात यशस्वीरित्या पार पाडले. अधिवेशनाची सुरवात प्रतिमांचे पूजन, श्रमिक गीत, व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ जिंदा, भारतीय मजदुर संघ जिंदाबाद या जोषपूर्ण घोषणांनी करण्यात आली. सर्व मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक सादर करण्यात आले. या अधिवेशनास उद्घाटक स्थानी राजेश पोफळी झोनल सचिव महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, व तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकरराव पहाडे महामंत्री सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक संघ महाराष्ट्र प्रदेश, व या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते निलेश खरात प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ हे लाभले, उपस्थित सर्व मान्यवरांनी कामगारांना मार्गदर्शन केले. अधिवेशनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष निलेश खरात यांनी मार्गदर्शन करतांना कंत्राटी कामगारांना नोकरी स्थैर्य कंत्रालदार विरहित रोजगार व समान काम समान वेतन मिळावे यासाठी आग्रही असल्याचे स्पष्ट केले यामागण्यासाठी कायदेशीर लढा तसेच आवश्यक असल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यासाठी नागपूर जिल्ह्यातील सर्व कामगारांनी सज्ज राहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अधिवेशनात जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांच्या गंभीर समस्या अडचणी व त्यावरील ठोस उपाययोजनांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली, जिल्ह्यातील संघटनात्मक स्थिती सदस्य नोंदणी व वर्गणी सुरू असलेली न्यायालयीन प्रकारले तसेच दैनंदिन बाबत काटेकोर व पारदर्शक अमलबजावणी करण्याचा ठाम निर्णय अधिवेशनात एकमताने 17 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आला. प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन करताना वीज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध संघटित व तीव्र लढा उभारण्याचे आव्हान केले भारतीय मजूर संघाच्या विचारधारेनुसार संघटन संघर्ष व संवाद या मार्गाने कामगारांचे प्रश्न सोडवले जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांसाठी चहा व भोजनाची व्यवस्था केली. अधिवेशनाच्या प्रसंगी सुकेश गुर्वे, अभिजीत माहुलकर, सागर साबळे, योगेश सावकर, मुरलीधर मांजरेकर, मुकेश पात्रीकर, अमोल धोटे, ज्ञानेश्वर कुडके, जावेद खान, गोपाल कुरील, सौरभ वैरागडे, हेमंत भांडारकर, सौरभ गायकवाड, सुनील जिचकार, यांच्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या अधिवेशनास 300 पेक्षा अधिक कंत्राटी वीज कामगारांची उपस्थिती यावेळी होती.




