spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध; अर्ज ते परीक्षा सर्व माहिती एका

 

मुंबई १५ :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – 2025 ही रविवारी (23 नोव्हेंबर 2025) रोजी आयोजित करण्याची घोषणा केली आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये इयत्ता 1 ते 5 (पेपर 1) आणि इयत्ता 6 ते 8 (पेपर 2) च्या शिक्षक पदांसाठी अनिवार्य आहे. ऑनलाइन अर्ज 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होतील आणि 3 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त होतील. प्रवेशपत्रे 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 या दरम्यान ऑनलाइन उपलब्ध होतील.

महाटीईटी (MAHATET 2025) परीक्षा सर्व व्यवस्थापनांमधील, ज्यात शासकीय, अशासकीय, कायम विनाअनुदानित शाळा, तसेच सर्व बोर्ड आणि माध्यमांतील इयत्ता 1 ते 8 च्या शिक्षकांसाठी अनिवार्य आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होणे, शिक्षण सेवक/शिक्षक म्हणून नियुक्तीसाठी आवश्यक आहे. परीक्षेसंबंधी सविस्तर माहिती, ज्यात शासकीय निर्णय, पुरवणी माहिती, सूचना, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, शुल्क भरण्याची प्रक्रिया, परीक्षेचे वेळापत्रक आणि इतर आवश्यक तपशील या बातमीत तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांना नियमितपणे संकेतस्थळाला भेट देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

MAHATET 2025 Exam dates: परीक्षांची तारीख आणि वेळ –

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल आणि 3 ऑक्टोबर 2025 रोजी समाप्त होईल. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र 10 नोव्हेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 या दरम्यान ऑनलाइन छापता येतील. पेपर 1 (प्राथमिक स्तर) 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 1:00 या वेळेत, तर पेपर 2 (उच्च प्राथमिक स्तर) त्याच दिवशी दुपारी 2:30 ते सायंकाळी 5:00 या वेळेत आयोजित केला जाईल. प्रशासकीय कारणांमुळे वेळापत्रकात बदल होऊ शकतो आणि याची माहिती अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.