spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाराष्ट्राचे विकसित दिशेने पाऊल भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे प्रतिपादन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महायुतीचे सरकार विकसित महाराष्ट्र या दिशेने नक्कीच पाऊल उचलत आहे असा विश्वास भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शुक्रवारी व्यक्त केला.

चव्हाण म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रामध्ये गुंतवणूक कशी येईल आणि त्या गुंतवणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल कसा होईल, त्या दृष्टिकोनातून सरकार काम करत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात चर्चा अनेक वेळा करण्यात आली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अर्थसंकल्पामध्ये दोन लाख रुपये पर्यंतची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. तसेच नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना सरकारच्यावतीने प्रोत्साहन भत्ता पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे असेही रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

आता विरोधकांना बोलण्यासारखं काही राहिलेले नाही आहे. अर्थसंकल्पामध्ये असणारा प्रत्येक विषय मग तो उद्योजक असेल सिंचनाच्या विषयांच्या अनुषंगाने घेतलेल्या या विषयांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम अर्थसंकल्पात झालेला आहे, त्यामुळे विरोधकांना आता बोलण्यासारखे काही राहिले नाही, असेही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी सांगितले.

लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुद्धा विरोधकांनी अपप्रचार चालवला होता. मात्र अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करण्याचे स्पष्ट झाल्यामुळे ही योजना आम्ही अधिक चांगली राबवून महिलांचे सक्षमीकरण करणार आहोत. एकीकडे आर्थिक शिस्त लावतांना दुसरीकडे एआय आधारित शेतीचा मजबूत पाया रचून कृषी क्षेत्राला नवे दिवस दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे, त्याचप्रमाणे एकूणच विविध विभागांच्या योजनांच्या अंमलबजावणीत तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सहज सुलभ आणि सुखी करण्याकडे ठोस पावलं उचलणारा हा अर्थसंकल्प आहे असेही त्यांनी सांगितले.

Popular Articles