– केंद्रीय मंत्र्यांची महर्षी वाल्मिकी मंदिराला भेट; वाल्मिकी समाजाला शताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छा
कामठी :- महर्षी वाल्मिकी जन्मोत्सव शताब्दी महोत्सवानिमित्त केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी महर्षी वाल्मिकी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी वाल्मिकी समाजबांधवांना शताब्दी महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. महर्षी वाल्मिकी यांचे जीवन त्याग, तपस्या आणि समानतेचे प्रतीक असून, त्यांनी रचलेले रामायण आजही समाजाला सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देते, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले.
या कार्यक्रमाला कामठी नगर परिषदेचे नगराध्यक्ष अजय रुपनारायण अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. महर्षी वाल्मिकी यांच्या जीवनकार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. जन्मोत्सव शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने वाल्मिकी समाजबांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
कार्यक्रमाला सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष तथा राज्यमंत्री दर्जा प्राप्त सतीश डागोर, वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष विलास झंझोटे, ज्येष्ठ नेते दिनेश बिल्लवार, मनपा नगरसेवक विक्की कुकरेजा, भाजपचे शहराध्यक्ष मंगेश यादव, भाजपचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते विवेक मंगतानी, नगरसेवक लालसिंग यादव, नगरसेविका दिव्या कपिल गायधने, मनीषा नागपुरे, अंतरा वैद, नगरसेवक दिलीप बंडेबुचे, नगरसेविका प्रणाली मेश्राम, छावणी परिषद उपाध्यक्ष कमलकिशोर यादव यांच्यासह विजय कोंडूलवार, कपिल गायधने, प्रीतम यादव, आशु अवस्थी, अथर्व पिंगले, हर्षल लिंबाचिया, श्रावण केझरकर, अश्विनीताई संतापे, आरतीताई मंगलानी आणि गेंदू कलसे उपस्थित होते.यावेळी भाजपचे पदाधिकारी, विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि वाल्मिकी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..








