– आमदार कृपाल तुमाने यांची ग्वाही; येरखेड्यात महाप्रसादासाठी हजारो भाविकांची उपस्थिती
संदीप कांबळे, कामठी :- येरखेडा येथील श्रद्धास्थान असलेल्या तारा माता मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देणार असून, मंदिराच्या विकासासाठी सदैव सहकार्य राहील, अशी ग्वाही आमदार कृपाल तुमाने यांनी दिली. तारा माता मंदिर येथे आयोजित महाप्रसाद कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. त्यांच्या या आश्वासनामुळे मंदिराच्या विकासाच्या अपेक्षांना बळ मिळाले आहे.
आमदारांच्या हस्ते पूजन व आरती
तारा माता मंदिरात आयोजित धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात आमदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते तारा मातेच्या मूर्तीचे पूजन व आरती करून करण्यात आली. यानंतर महाप्रसाद वितरणाला प्रारंभ झाला. या धार्मिक सोहळ्यास परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावत महाप्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
तारा माता मंदिर हे परिसरातील भाविकांच्या श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र असून, मंदिराचा सर्वांगीण विकास व्हावा, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त केली जात आहे. मंदिराच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत आमदार कृपाल तुमाने यांनी सकारात्मक भूमिका मांडली. त्यामुळे आगामी काळात मंदिर परिसरातील विकासकामांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष राजकिरण बर्वे, उपाध्यक्ष रंजना काळे, बांधकाम सभापती मनीष कारेमोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य सरिता रंगारी, अनुराधा भोयर, माजी सरपंच मंगला कारेमोरे, नगरसेविका ममता राजेश पिपरेवार, सुशांत सलाम, प्रशांत काळे, मंदा महल्ले पाटील, योगिता खोब्रागडे, शितल मथुरे, ईश्वरसिंग चौधरी आणि राजेंद्र चौरे यांची उपस्थिती होती.
याशिवाय मंदिर पंच कमिटीचे सचिव सुदाम राखडे, कोषाध्यक्ष जगदीश झाडे, वसंतराव फायदे, मधुकरराव ढोले, लोणेश्वर देशमुख, शीला देशमुख, मीना दास, भाऊराव देशमुख, राम देशमुख, घनश्याम गुजेवार, मनोहर पारधी, युवराज भोगे, मुरलीधर पारधी, दास बाबू, प्रवीण भाईदे, सरिता भोयर, संगीता भोगे, रजनी कारेमोरे, सुषमा राकडे, रुपेश श्रीवास्तव, वसंतराव गुजेवार, रमेश कारेमोरे, प्रा. किशोर ढोले, गौरीशंकर ढिंबोले आणि भोजराज अंबाळकर यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
धार्मिक उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन सुदाम राखडे यांनी केले, तर रेणुका गुजेवार यांनी आभार प्रदर्शन केले.







