spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

– शक्तिप्रदर्शनातून निवडणूक रणशिंग; भंडारा-गोंदिया विधानपरिषद निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष

हंसराज, भंडारा :- भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भंडारा येथील लक्ष्मी सभागृहात महायुतीची जाहीर सभा घेण्यात आली. त्यानंतर मोठ्या उत्साहात रॅली काढत जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.

यावेळी खासदार प्रफुल पटेल, आमदार परिणय फुके, आमदार राजकुमार बडोले, आमदार राजू कारेमोरे, आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय , आमदार विजय रहांगडाले, माजी खासदार सुनील मेंढे, सुनील फुंडे, राजेंद्र जैन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र आमदार नरेंद्र भोंडेकर कुठेही दिसलें नाही, उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत महायुतीच्या नेत्यांनी एकजुटीचा संदेश देत निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला.

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या संख्येच्या आधारावर ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. विदर्भातील आपली संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी भाजप आणि महायुतीसाठी ही निवडणूक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

या मतदारसंघात एकूण ४५७ मतदार असून महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीकडे जवळपास १०० मतदारांचे संख्याबळ अधिक असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला निवडणुकीत महायुतीचे पारडे जड मानले जात असले तरी मतदान आणि मतमोजणीपर्यंत राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष राहणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.