spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

माई ग्रुपचे संचालक डॉ. मोतीलाल चौधरी आयकॉन पुरस्काराने सन्मानित

– माई ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मोतीलाल चौधरींना महाराष्ट्र बिझनेस आयकॉन पुरस्कार प्रदान

नागपूर :- माय अ‍ॅसेट्स इन्फ्रा (माई ग्रुप) चे सीएमडी डॉ. मोतीलाल चौधरी हे नागपूरच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील एक अत्यंत विश्वासार्ह व मान्यवर नाव म्हणून ओळखले जातात. २५ वर्षांहून अधिक मार्केटिंग अनुभव आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील २१ वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी मजबूत, विश्वासार्ह व लोकाभिमुख अशी ओळख निर्माण केली आहे. रणनीतीपूर्ण दृष्टिकोन आणि नैतिक व्यावसायिक मूल्यांचा समतोल साधत माई ग्रुपने गुंतवणूकदार, घर खरेदीदार आणि उद्योगातील सर्व भागधारकांमध्ये एक विश्वासार्ह ब्रँड म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे. २७ जानेवारी रोजी reseal.com व इंडिया फॅशन आयकॉन मॅगझिन यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथील सोमा वाईन व्हिलेज रिसॉर्ट येथे आयोजित भव्य समारंभात, हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते डॉ. मोतीलाल चौधरी यांना महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड २०२५ प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील सुमारे ५०० हून अधिक उद्योजक तसेच अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. डॉ. चौधरी यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रतिष्ठित सन्मान प्राप्त झाले आहेत. १२ मार्च २०२३ रोजी सामाजिक सेवेत उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना अमेरिकन ईस्ट कोस्ट युनिव्हर्सिटी कडून मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली होती तसेच ३ सप्टेंबर २०२३ रोजी त्यांना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार देण्यात आला होता. २४ सप्टेंबर २०२४ रोजी नवी दिल्ली येथे आयोजित ग्लोबल एक्सलन्स फोरम तर्फे त्यांना इंडियन आयकॉन अवॉर्ड देण्यात आला तर २४ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांना भारत सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले. याच वर्षी RED FM आणि BIG FM तर्फे त्यांना बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आला तर NAREDCO विदर्भ तर्फे माई ग्रुपला प्राईड ऑफ रिअल इस्टेट ब्रँड – नागपूर हा सन्मान मिळाला.

माई अ‍ॅसेट्स इन्फ्राचा प्रवास

डॉ. चौधरी यांच्या नेतृत्वाखाली ४ मार्च २०१६ रोजी माई अ‍ॅसेट्स इन्फ्रा (माई ग्रुप) ची स्थापना झाली. अल्पावधीतच ग्रुपने नागपूरच्या वर्धा रोड, हुडकेश्वर रोड, हिंगणा रोड आणि अमरावती रोड परिसरात एकूण ३२ रिअल इस्टेट प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. ग्रुपच्या पोर्टफोलिओमध्ये प्रीमियम निवासी प्लॉट्स, फ्लॅट्स आणि फार्महाऊस यांचा समावेश असून गुणवत्ता व पारदर्शकतेच्या उच्च निकषांनुसार ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण केल्या जातात.

ग्राहक-केंद्रित दृष्टिकोन

डॉ. चौधरी यांच्या मते, यशाचे खरे मोजमाप केवळ इमारती उभारण्यात नसून ग्राहकांचा विश्वास, समाधान आणि प्रामाणिकपणा यामध्ये आहे. हाच विश्वास माई ग्रुपचा मूलमंत्र आहे.यामुळे गुंतवणूकदार, ग्राहक आणि विक्री प्रतिनिधी हे सर्वजण विकासाच्या प्रक्रियेत भागीदार बनतात आणि दीर्घकालीन नातेसंबंध निर्माण होतात.

सामाजिक जबाबदारीची जाणीव

व्यवसायासोबतच डॉ. मोतीलाल जियालाल चौधरी सामाजिक कार्यासाठीही कटिबद्ध आहेत. त्यांच्या माई फाउंडेशन या संस्थेमार्फत ते विविध सामाजिक उपक्रम राबवतात — वार्षिक आरोग्य तपासणी शिबिरे, नेत्र तपासणी व मोफत चष्मा वाटप, दंत तपासणी, रक्तदान शिबिरे तसेच दरवर्षी सुमारे ५०० पेक्षा अधिक वृक्षारोपण केले जाते. या माध्यमातून सामाजिक विकास आणि पर्यावरण संरक्षणासाठी ते महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

दूरदृष्टी व करुणेचे प्रतीक

डॉ. चौधरी हे केवळ यशस्वी उद्योजकच नाहीत, तर संवेदनशील समाजसेवक आणि आदर्श व्यक्तिमत्त्व देखील आहेत. नैतिक नेतृत्व, दीर्घकालीन विचार आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर समन्वय त्यांच्या प्रवासातून दिसून येतो. याप्रसंगी डॉ. मोतीलाल चौधरी यांनी या सन्मानाचे श्रेय आपल्या माता- पित्यांना, कुटुंबीयांना, माई ग्रुपच्या संपूर्ण टीमला व मित्रपरिवाराला दिले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.