spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

संविधानिक अधिकार कायम ठेवा अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल – हरिष उईके

– आदिवासी समाजात वाद निर्माण करणे सत्तापक्षाचे षडयंत्र

नागपूर :- गोंडवाना गणतंत्र पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हरीश उइके यांच्या नेतृत्वाखाली यशवंत स्टेडीयम येथे आदिवासी समाज बांधवांच्या हजारो संख्येत एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. आदिवासी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील सत्तापक्षाने बंजारा व धनगर समाजाचा वाद आमच्या समाजाच्या मागे लावल्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे. आदिवासींचे आरक्षण हे धनगर व बजारा समाजाला कसं देतात हा वाद निर्माण करण्याचे षडयंत्र सत्ता पक्षाचे आहे. आदिवासींच्यामधून बंजारा व धनगर समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण देऊ नये. असे व्यक्तव्य हरीश उईके यांनी केले आहे. राष्ट्रीय उद्यानामध्ये असणाऱ्या वाघाच्या हल्ल्यातून शेजारी गावातील राहणाऱ्या लोकांना वाचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने उपाययोजना करावी. तसेच त्यांच्या संरक्षणाकरिता सोलर कंपाऊंड लावण्याची व्यवस्था करावी. मृत व्यक्तीच्या कुटुंबांना 50 लाख रुपयांची मदत देवून कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी. आमचे संविधानिक अधिकार कायम ठेवा अन्यथा आदिवासी समाज रस्त्यावर उतरेल व एकूण ३० मुद्द्यांवर शेतकरी सेतमजूर शिक्षणाचे प्रश्न स्वास्थ सुविधाच्या प्रश्नांना घेऊन शेतकऱ्यांचे कर्जमाफी सातबारा कोरा कधी होणार ? विद्यार्थ्यांना नोकरी व शिक्षणाचे प्रश्न कधी सुटणार ? इतर सर्व प्रश्नांना घेऊन जल जंगल जमीन बचाव प्रश्नांना घेऊन हा आंदोलन करण्यात आले होते. या धरणे आंदोलनात पक्षातील सर्व पदाधिकारी व मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

Popular Articles