पांढरकवडा :- लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर दीड वर्षापासून लैंगिक अत्यांचार करणाऱ्या नराधमाला पांढरकवडा पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो, आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी ही पांढरकवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात आपल्या कुटुंबासह राहते. पीडितेची आणि आरोपी किरण हुसेन बोरकर (वय २० वर्षे, रा.पांढरकवडा) याची जुलै २०२४ पासून ओळख होती. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेच्या घरी किंवा स्वतःच्या घरी कोणी नसतांना “आपण लन्न करू असे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार शारीरिक अत्याचार केले, हा प्रकार गेल्या दीड वर्षापासून सुरू होता. मात्र, दि. २९ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आरोपीने मद्यधुंद अवस्थेत पीडितेशी वाद घालून तिला मारहाण केली. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने ३० जानेवारी रोजी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पांढरकवडा पोलिसांनी आरोपी किरण बोरकर विरुद्ध अपराध क्रमांक १३६/२०२६ अन्वये खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे भारतीय न्याय संहिता नुसार कलम ६४, ६४(२), ६५(१), ११५(२) तसेच पोक्सो कायदा: कलम ४ व ६ व अनुसूचित जाती-जमाती अत्यांचार प्रतिबंधक कायदा: कलम ३(२), (va) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस प्रशासनाने तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला काही तासांतच ताब्यात घेतले, सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबीन बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पांढरकवड़ा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक एल. डी. तावरे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पेंढारकर व पोलीस शिपाई विकेश ध्यावर्तीवार यांनी ही यशस्वी कारवाई केली.








