Home Latest News माणगाव तालुका क्रीडा संकुल वर्षभरात पूर्ण होणार – मंत्री आदिती तटकरे

माणगाव तालुका क्रीडा संकुल वर्षभरात पूर्ण होणार – मंत्री आदिती तटकरे

0

<p><strong>मुंबई &colon;<&sol;strong>&&num;8211&semi; रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका क्रीडा संकुलाचे काम वर्षभराच्या आत पूर्ण करण्यात येणार असून&comma; माणगाव येथे अत्याधुनिक सुविधा असलेले उप-विभागीय क्रीडा संकुल उभारण्यासाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्यात येईल&comma; अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली&period;<&sol;p>&NewLine;<p>याबाबत सदस्य प्रविण दरेकर यांनी प्रश्न उपस्थित केला&period; तर सदस्य अनिकेत तटकरे&comma; भाई जगताप यांनी उपप्रश्न उपस्थित केले&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या&comma; माणगाव हे रायगड जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून&comma; २०२० च्या चक्रीवादळात तालुका क्रीडा संकुलाचे नुकसान झाले होते&period; त्यानंतर विभागीय क्रीडा संकुलासाठी २४ एकर जागा क्रीडा विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली असून&comma; ८५ कोटी रुपयांचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला होता&period; मात्र&comma; खारघर येथे विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रस्तावामुळे हा विषय प्रलंबित राहिला&period; या कालावधीत माणगाव तालुका क्रीडा संकुलासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून&comma; त्यापैकी २ कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले आहे&period; या कामाला गती देण्यासाठी लवकरच स्वतंत्र बैठक घेऊन काम तातडीने सुरू करण्यात येईल&comma; असे त्यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>खारघर येथे विभागीय क्रीडा संकुल उभारले जात असले तरी माणगावमध्ये विशेष बाब म्हणून उप-विभागीय क्रीडा संकुल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येईल&period; या संकुलात स्विमिंग पूल&comma; क्रिकेटसह विविध क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>माणगाव विभागीय क्रीडा संकुलासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोरणात्मक निर्णय घेतला जाईल&period; डोंगरी भागातील क्रीडा संकुलांच्या विकासासाठी विशेष धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल&period; तसेच रत्नागिरीतील क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त निधीच्या प्रस्तावाचा विचार करून आवश्यक तरतूद करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल&comma; असे मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version