Home Latest News नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार – मंत्री उदय सामंत 

नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार – मंत्री उदय सामंत 

0

<p><strong>मुंबई &colon;-<&sol;strong> नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल&comma; असे मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले&period;<&sol;p>&NewLine;<p>याबाबत सदस्य भाई जगताप यांनी प्रश्न उपस्थित केला&period; तर सदस्य परिणय फुके यांनी उपप्रश्न उपस्थित केला&period;<&sol;p>&NewLine;<p>मंत्री उदय सामंत म्हणाले&comma; पाणी गुणवत्ता तपासणी&comma; पाईपलाईन दुरुस्ती&comma; जलशुद्धीकरण व्यवस्था आणि वितरण प्रणालीतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासनाला आवश्यक निर्देश देण्यात येतील&period; तसेच पर्यावरण विभागालाही दूषित पाणी पुरवठ्यामुळे होणाऱ्या परिणामांची तपासणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या जातील&period; संबंधित कंपनीने करारातील अटींची पूर्तता केली आहे का&comma; याची सखोल पडताळणी केली जाईल&period; अटींचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास कंपनीविरुद्ध कराराचा पुनर्विचार किंवा आवश्यक ती कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला जाईल&comma; असे त्यांनी स्पष्ट केले&period;<&sol;p>&NewLine;<p>या प्रश्नावर नागपूर शहरातील आमदारांची समिती स्थापन करून सविस्तर अभ्यास केला जाईल&period; नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असून&comma; कोणत्याही रहिवाशावर अन्याय होणार नाही याची शासन पूर्ण काळजी घेईल&comma; असे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version