spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चिखलीचे माजी नगराध्यक्ष नंदू सवडतकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश

– भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत

बुलडाणा जिल्ह्यातील चिखलीचे माजी नगराध्यक्ष, बाजार समितीचे माजी उपसभापती नंदू सवडतकर यांनी शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांसह शुक्रवारी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. चिखली येथील काँग्रेसचे सरपंच, माजी सरपंच, उप सरपंच, पंचायत समिती सभापती, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी आमदार श्वेता महाले, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष संजय कौडगे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन आदी उपस्थित होते.

यावेळी चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील केंद्र आणि राज्यातील सरकारची विकासाभिमुख धोरणे, राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या भाजपाच्या विचारसरणीने प्रेरित होऊन या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. सामाजिक कार्याचा अनुभव असलेले हे सर्वजण आता भाजपाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार असल्याने बुलडाणा जिल्ह्यात पक्षाची ताकद आणि जनाधार आणखी मजबूत हाईल. या सर्वांनी भाजपाच्या विचारसरणीवर आणि नेतृत्वावर जो विश्वास दाखवला आहे, त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली. पक्षात येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला उचित स्थान, सन्मान आणि काम करण्याची संधी देण्यात येईल असेही ते म्हणाले. आगामी काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे, जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यावे आणि केंद्र व राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही चव्हाण यांनी यावेळी केले.

यावेळी आ. श्वेता महाले म्हणाल्या की, केंद्र आणि राज्यातील विकासकामांने प्रभावित होऊन या सर्वांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये या सर्वांचे मोलाचे योगदान भाजपाला लाभणार आहे. भाजपाची विचारधारा तळागाळात पोहोचवण्यासाठी हे सर्व अनुभवी कार्यकर्ते मदत करतील असेही त्या म्हणाल्या.

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघातील काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये काँग्रेसचे नेते गुलाबराव सपकाळ, चिखलीचे शहराध्यक्ष राहुल सवडतकर, माजी सभापती पंचायत समिती अरविंद देशमुख, शिवव्याख्याते संतोष गवारे पाटील, विशाल सवडतकर, प्रदीप सवडतकर, तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष अमोल काकडे, शेलगावचे सरपंच (शिंदे गट) अरुण सरनाईक, रुइखेडचे सरपंच अनिल फेपाळे, शेलोडीचे माजी सरपंच दिलीप नरवाडे, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर रामेकर आदींचा समावेश आहे.

Popular Articles