तिरोडा :- आज तिरोडा येथील स्थानिक जनसंपर्क कार्यालयात पक्षप्रवेश विशेष कार्यक्रम पार पडला. पक्षाच्या पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवत तिरोडा शहरातील अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. प्रासंगिक पक्षाचा दुपट्टा घालून रविकांत बोपचे यांनी पक्षात विधिवत स्वागत केले. पक्षात प्रवेश केल्याबद्दल त्यांचे पक्षाच्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले.
या वेळी बोलताना प्रवेशितांनी सांगितले की, “पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आणि समाजहितासाठी काम करण्याच्या हेतूने मी हा निर्णय घेतला आहे. पुढील काळात जनतेच्या प्रश्नांसाठी कटिबद्ध राहून काम करणार आहे.”
यावेळी तालुका अध्यक्ष कैलास पटले, विधानसभा अध्यक्ष ओमप्रकाश रहांगडाले, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष युवराज शहारे, डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष एम डी. पटले, महिला अध्यक्ष भाग्यश्री केळवतकर, कार्यवाह शहर अध्यक्ष आशिष येरपुडे, शहर कार्याध्यक्ष रजनीकांत शरणागत, शहर उपाध्यक्ष विजय बुद्धे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जॉनी सैय्यद, शहर सामाजिक न्याय विभाग प्रमुख मंगेश गेडाम, सरपंच रवींद्र भगत , सरपंच मंदा टेंभरे, सरपंच, छाया टेकाम, उषा शामकुल, रिता नारनवरे, ममता ठाकरे, रमेश भगत, राजेश तांडेकर, निरज गजभिये, डीलेश बिसेन, संजय टेंभरे, संकेत शामकुल, अमन नारनवरे, केतन रामटेके, मारोती संतापे आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




