कामठी :- प्रभाग क्रमांक २ मधील गांधी नगर परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी नगर परिषद अध्यक्ष अजय अग्रवाल यांनी गुरुवारी (१३ ऑगस्ट) परिसराला प्रत्यक्ष भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी मांडलेल्या समस्या व स्थानिक पातळीवरील मूलभूत सुविधांची पाहणी करून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
परिसरातील नागरिकांशी थेट संवाद साधत अध्यक्ष अग्रवाल यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, नाल्या तसेच अन्य नागरी सुविधांबाबत नागरिकांकडून मांडण्यात आलेल्या प्रश्नांची त्यांनी गांभीर्याने दखल घेतली. नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी समजून घेऊन त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
“नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही नगर परिषदेची प्राथमिकता आहे. परिसरातील समस्या केवळ कागदोपत्री न राहता त्यांचे प्रत्यक्ष निराकरण होणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी,” असे निर्देश अध्यक्ष अग्रवाल यांनी दिले.
यावेळी नगरसेवक नियाज कुरैशी, फारूख कुरैशी, विद्यानंद खोब्रागडे यांच्यासह तथागत वेलफेअर युनिट गांधी नगर व खाटीक समाजाच्या महिला सदस्य इंदुबाई गणवीर, गीता राऊत, पंचशीला गजभिए, सुशीला मेश्राम, सीमा गणवीर, रत्नमाला गजभिए, काजल पानतावने, पूजा चव्हाण, कामिनी, पद्मा करनवार, पिंकी शेंडे, पूनम राऊत आदी महिला उपस्थित होत्या.
तसेच सतीश गणवीर, शुभम पाटील, पलाश गजभिए, पिंटू भागवत, महेंद्र लांजेवार, प्रियांशु, सूरज सहारे, नीलेश गजभिए, शैलेश ढोके, क्षितिज चिमनकर, शीलू सहारे, सतीश लांजेवार, गौरव पानतावणे, उमंग मेश्राम, साहिल गजभिए, अंकुश खोब्रागडे, राजेश राऊत, दद्दू मेश्राम, महेंद्र ढवळे, सोलजर राऊत, सुनील लारोकार, श्याम मेश्राम, राजू भागवत, अजीम पठाण यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.





