– कामठीच्या सुख-शांती, सामाजिक सलोखा आणि सर्वांगीण विकासासाठी दर्ग्यात केली विशेष प्रार्थना
कामठी :- कामठी रेल्वे स्थानक मार्गावतील हजरत बाबा अब्दुल्लाह शाह नौशाही कादरी दर्ग्यात आयोजित १५३ व्या उर्स शरीफनिमित्त नगर परिषद कामठीचे अध्यक्ष अजय रुपनारायण अग्रवाल यांनी श्रद्धापूर्वक उपस्थित राहून चादर व पुष्प अर्पण केले. यावेळी त्यांनी दर्ग्यात सर्व नगरवासीयांच्या सुख-शांती, बंधुभाव, सामाजिक सलोखा, समृद्धी तसेच कामठी शहराच्या सातत्यपूर्ण प्रगती व भरभराटीसाठी विशेष दुआ केली.
उर्स हा धार्मिक श्रद्धेबरोबरच सामाजिक ऐक्य आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारा उत्सव मानला जातो. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. उपस्थित श्रद्धाळुनीही शहरात कायम शांतता, सौहार्द आणि विकासाचे वातावरण राहावे, अशी प्रार्थना केली.
या प्रसंगी इक्बाल ताजी,आबीद ताजी, रकीब भाई, रझा भाई, अयाज एस. के., मोहम्मद उजैर रहीम, इरशाद पटेल, जाहिद अली, मोहम्मद सलमान, एहतेशाम शहजाद अन्सारी, मोहम्मद आमिर, टिपू भाई, रेहान राईन यांच्यासह अनेक मान्यवर श्रद्धाळू मोठ्या संख्येने उपस्थित होते.




