spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गादा टी-पॉईंटवर पोलिसांचा दणका!

– अवैध देशी दारूची वाहतूक उधळली; दारूसह दुचाकी जप्त, ₹५५,६४० चा मुद्देमाल हस्तगत

कामठी :- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गादा–लिहीगाव टी-पॉईंट मार्गावर अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका तरुणास पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याकडून अवैध देशी दारू व दुचाकीसह एकूण ₹५५,६४० किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गादा–लिहीगाव टी-पॉईंट मार्गावर सापळा रचण्यात आला. यावेळी पांढऱ्या रंगाची होंडा मास्ट्रो दुचाकी (क्र. एमएच-४९-टी-२४६१) अडवून तपासणी केली असता, वाहनातून ₹५,६४० किमतीची अवैध देशी दारू आढळून आली. पोलिसांनी दारूसह दुचाकी जप्त करून एकूण ₹५५,६४० किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

या प्रकरणी ऋषभ मुन्नालाल वर्मा (वय ३०, रा. हैदरी चौक, कामठी) याच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सूरज ठाकूर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Popular Articles