spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापौर, उपमहापौर यांच्या हस्ते हुतात्मा गोवरी स्मारकास पुष्पचक्र अर्पण

– मनपाद्वारे आदिवासी गोवारी हुतात्म्यांना आदरांजली

नागपूर :- नागपूर महानगरपालिकाद्वारा आदिवासी गोवारी हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

महापौर निता ठाकरे आणि उपमहापौर लिला हाथीबेड यांच्या हस्ते सोमवारी(ता.२३) मनपाच्या वतीने झिरो माईल चौक स्थित हुतात्मा गोवारी स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी झोन सभापती धनश्री देशपांडे, सरस्वती सलामे, नगरसेविका पूजा पाठक, सरस्वती सलामे, नगरसेवक सर्वश्री. विनय दाणी, सुनील हिरणवार, योगेश पाचपोर, प्रमोद ठाकूर, शैलेश पांडे, गोवरी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष कैलाश राऊत, गोवरी स्मारक समितीचे अध्यक्ष शालोक नेवारे, धरमपेठ झोनचे सहा. आयुक्त राजकुमार मेश्राम, जनसंपर्क अधिकारी  मनिष सोनी, अमोल तपासे, शैलेश जांभूळकर, तसेच मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.

Popular Articles