spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कारधा पोलिसांची अवैध हातभट्टीवर धडक कारवाई; ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,भंडारा :- कारधा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा झबाडा येथे पोलिसांनी अवैध हातभट्टीवर छापा टाकून ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी नितीन आनंदराव शेलारे (वय ५०, रा. झबाडा, ता. जि. भंडारा) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस हवालदार राठोड यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. धाडीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात मोहापास सडवा, १० लिटर हातभट्टी दारू, लोखंडी व प्लॅस्टिकचे ड्रम, जळाऊ काड्या, जर्मन करची आणि चुली असा एकूण ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

या प्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात अप. क्र. ८१९/२०२६, महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), (फ), (ब), (क), (ड) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राठोड आणि बेदरकर यांनी केली असून, पुढील तपास कारधा पोलीस करीत आहेत.

Popular Articles