spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महापौर निता ठाकरे यांच्यासह नगरसेवकांनी घेतली आगग्रस्तांची भेट

– यशवंत स्टेडियम जवळील उदासी आश्रम जवळील चार झोपड्या जळून खाक

नागपूर :- यशवंत स्टेडीयमजवळील उदासी आश्रमाला लागून असलेल्या झोपडपट्टीमध्ये सोमवारी (ता. 16) सकाळी आग लागून चार झोपड्या जळून खाक झाल्या. महापौर निता ठाकरे यांच्यासह प्रभाग क्रमांक १५ च्या नगरसेवकांनी आगग्रस्त कुटुंबियांची भेट घेतली. नागपूर महानगरपालिका व राज्य सरकारतर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले व जख्मींची विचारपूस केली.

यशवंत स्टेडीयमच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीतील आगग्रस्तांची महापौर निता ठाकरे यांनी भेट घेतली. यावेळी नगरसेवक विनय दाणी, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका पूजा पाठक, नगरसेविका धनश्री देशपांडे, सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम उपस्थित होते. या आगग्रस्तांना निवारा व तात्पुरत्या उदरनिर्वाहाची सोय करण्यासाठी राज्य सरकारने त्वरित मदत द्यावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने पाठपुरावा करावा, असे निर्देश महापौर निता ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महापौर निता ठाकरे यांनी या आगीत झोपड्या जळालेल्या कुटुंबियांकडून आगीचे कारण जाणून घेतले व या आगीत जखमी झालेल्यांची विचारपूस केली. आगग्रस्त बसंती ठाकूर, योगेश ठाकूर, राजेंद्र सिंग सड्डल व सुरेश ठाकूर यांच्या कुटुंबातील सदस्यांची महापौरांनी भेट घेतली. या आगीत चार झोपड्या पूर्णपणे जळालेल्या आहेत. या कुटुंबातील सदस्यांची तात्पुरती निवार्याची सोय करण्याची आवश्यकता आहे. यासाठी राज्य सरकारकडून तात्काळ मदतीसाठी पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी आगग्रस्तांना दिले. नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना या संदर्भात माहिती दिली जाईल व आगग्रस्तांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रशासन स्तरावरून प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी यावेळी दिले.

Popular Articles