spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिबिराद्वारे ६० दिव्यांग बालकांची वैद्यकीय तपासणी

यवतमाळ :- मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार आणि नागेश वि. न्हावकर, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग बालकांसाठी विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ येथे हे शिबिर पार पडले. ६ ते १८ वयोगटातील दिव्यांग बालकांची ओळख व दिव्यांगत्वाचे निदान करण्यासाठी आयोजित या शिबिरात एकूण ६० बालकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामधील २८ बालकांची सेतू मार्फत ऑनलाईन नोंदणी करून दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या शिबिरासाठी झरी-जामणी, उमरखेड, यवतमाळ जिल्ह्यातुन बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. सर्व तपासण्या एकाच ठिकाणी करण्याची व्यवस्था करण्यात आल्यामुळे पालक व बालकांना मोठा दिलासा मिळाला. या शिबिराच्या यशस्वी आयोजनात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ, वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी दीपक एच. दाभाडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळ, प्रमुख उपस्थित होते. तसेच वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. अनिल बात्रा, उपअधिष्ठाता डॉ. आनंद आशिया, अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉ. जय राठोड, डॉ. गजानन वार, डॉ. गौरव, डॉ. शंशाक, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्नेहल बोन्डे व त्यांची टीम, बालरोग तज्ज्ञ डॉ. केशवाणी, डॉ. विशाल चव्हाण, ईएनटी तज्ज्ञ डॉ. रामेश्वर पवार यांनी बालकांची सखोल तपासणी केली.

Popular Articles