spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आदिवासी गोवारी समाजाद्वारे गुणवंत गुणगौरव सोहळा.

रामटेक सचिन चौरसिया ०२  :- आदिवासी गोवारी (गोंड गोवारी) फाऊंडेशन तर्फे दरवर्षीप्रमाणे दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सत्कार सोहळा रविवार दि.२९ जुन रोजी दुपारी २ वाजता अपलोना गोंटूल या आदिवासी सभागृहा मध्ये पार पडला. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी   वर्धराज पिल्ले शिवसेना उपजिल्हाप्रमुख,  शेखर लसुते संपादक साप्तहिक आदिवासी वार्ता,  चिंतामण वाघाडे उपाध्यक्ष  आदिवासी गोवारी स्मारक समिती  कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास राऊत आदिवासी गोवारी समाज संघटन महाराष्ट्र प्रदेश, भास्कर राऊत अध्यक्ष आदिवासी गोवारी(गोंड गोवारी) फाऊंडेशन उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला  स्वातंत्रता संग्राम चे महानायक भगवान बिरसा मुंडा व आदिवासी स्मारक यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलीत करण्यात आले. उपस्थित मान्यवराचा सत्कार करण्यात आला. मान्यवराच्या भाषणा नंतर प्रमुख मार्गदर्शकानी विद्यार्थांनी जिद्द, चिकाटी, संयम, सहनशीलता व एकाग्रता ठेऊन यशाची पायरी चढता येथे. रडत बसण्यापेक्षा केव्हाही लढत राहणे आवश्यक आहे. एक ना एक दिवस आपण आपल्या कार्यात यशस्वी होऊ असे प्राध्यापक ज्ञानेश्वर नेवारे सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. शिक्षक जीवन राऊत सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वर्षी बारावीतील प्रथम पारितोषिक क्षितिज वाघाडे, द्वितीय नम्रता मुर्खे, तृतीय आदित्य नेवारे यांना तर दहावी मधील गुणवंत विद्यार्थी मध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी नेवारे, द्वितीय क्रमांक चेतना चौधरी तर तृतीय क्रमांक क्रिश नेवारे यांना व इतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मान चिन्ह व पुष्पगच्छ देऊन उपस्थित मान्यवारचाहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ज्येष्ठ समाज सेवक प्रभाकर नेवारे, माजी नगरसेवक अनिल ठाकरे, बलधारी नेवारे, फागण नेवारे, आनंद शहारे, जगदीश शेंद्रे, रवी देव्हारे, मनोहर सोनवणे, सुखदेव शेंद्रे, उमेश राऊत, सतीश गाडे, ब्रम्हानंद नेवारे, रवींद्र कोहळे, लक्ष्मी राऊत, लेखिका कोहळे सह विद्यार्थी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आनंद शहारे व प्रास्ताविक जीवन राऊत सर तर नंदकिशोर कोहळे यांनी आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.