सावनेर :– कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील नागरिक व भाविकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सावनेर–परतवाडा मार्गे शेगाव नियमित बससेवा अखेर पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे. जननेते आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा, प्रयत्न व प्रशासनाशी केलेल्या प्रभावी समन्वयामुळे ही बससेवा आजपासून नियमितपणे सुरू झाली. या बससेवेचा शुभारंभ भाजप नेते रामराव मोवाडे व नगराध्यक्षा सौ. संजना मंदार मंगळे यांच्या हस्ते बसचे पूजन करून तसेच चालक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिक, भाविक व प्रवाशांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला. दीर्घकाळ बंद असलेली ही बससेवा पुन्हा सुरू झाल्याने सावनेर, कळमेश्वर तसेच परिसरातील हजारो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व शेगावला जाणारे भाविक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. धार्मिक, सामाजिक व प्रवासी सुविधेच्या दृष्टीने ही सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार असून नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यावेळी आगार व्यवस्थापक, नगरसेवक व विविध मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रामराव मोवाडे, नगराध्यक्षा संजना मंदार मंगळे, उपाध्यक्ष राजू घुगल, गटनेते रविंद्र ठाकूर, सभापती निलेश पटे, महेश चकोले,शालिक मोहतुरे, राजू भुजाडे, दिवाकर नारेकर, मंदार मंगळे, तुषार उमाठे, दुर्गेश पारवे, राजेश गुप्ता, अर्पना बागडे, सोनाली उमाठे, सुचिता सुरे, रिमा बालाखे, नलिनी नारेकर, मनीषा खंगारे, रितेश सूर्यवंशी, प्रवीण नारेकर, पिंटू सातपुते,वसंता सय्याम, वसंता कामडी यांच्यासह अनेक कार्यकर्ते, भाविक व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी नागरिकांना आवाहन केले की, “ही बससेवा परिसरातील भाविक, महिला, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त असून जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवाचा लाभ घ्यावा.” सावनेर विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या प्रश्नांसाठी आमदार डॉ. आशिष देशमुख सातत्याने पाठपुरावा करीत असून ही बससेवा पुन्हा सुरू होणे हे त्यांच्या लोकाभिमुख कार्याचे आणखी एक उदाहरण असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
“आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश; सावनेर–परतवाडा मार्गे शेगाव बससेवा पुन्हा सुरू”
Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.