spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनसेचे उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांच्या अनोख्या दिनदर्शिकेचे लोकार्पण

नागपूर :- महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पश्चिम विभागातर्फे नागपूर शहरातील उपाध्यक्ष तुषार गिऱ्हे यांचे तर्फे २०२६ चे १०००० प्रति छापण्यात आल्या असून त्याचे लोकार्पण राजू उंबरकर नेते महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या शुभहस्ते शुक्रवारी १९ डिसेंबर रोजी करण्यात आला. पक्ष हा कसा घरोघरी पोहोचेल याच्यासाठी हा प्रयत्न आहे आणि या दिनदर्शिकेमध्ये विशेष म्हणजे दूध, केबल, इलेक्ट्रिक बिल, शाळेची फीस, किराणा इत्यादी, असे काही महत्त्वाचे घटक जे आपल्या रोजच्या दिनचर्या मध्ये कामी येणारे सर्व त्याच्यात दिलेले आहे आणि एक वेगळेच दिनदर्शिका त्यांनी बनवलेला आहे आणि घरी घरी पोहोचल्यानंतर ते नक्की लोकांना आवडेल अशी ही दिनदर्शिका. त्यावेळी प्रामुख्याने उपस्थित नागपूर शहर अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे, शहर सचिव शाम पुनियानी, शहर सहसचिव दुर्गेश साकुलकर, विभाग संघटक चेतन शिराळकर, विभाग उपाध्यक्ष रामुजी खोब्रागडे, समशेर अन्सारी, अजिंक्य मिश्रा, आदित्य मानकर, अंश कोल्हे, उज्वल कोरडे, चेतन बोरकुटे व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.

Popular Articles