spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोदी सरकारने खतावर अनुदान दिल्याने कोट्यवधी शेतकऱ्यांना दिलासा

– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचे प्रतिपादन

युद्धकाळात अनेक राष्ट्रांमध्ये पेट्रोल-डिझेल आणि खतांचे दर वाढले होते. याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसू नये म्हणून केंद्रातल्या मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामासाठी 62 हजार 370 कोटी रुपयांचे खत अनुदान मंजूर केले आहे. त्यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात सुमारे 24 हजार 418 कोटी रुपयांची वाढ करण्यात आल्याने खतांच्या किमती मर्यादित राहणार आहेत. डीएपी खताची गोणी 1,350 रुपयांनाच मिळणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार, मोठा दिलासा मोदी सरकारने दिला आहे. आम्ही फक्त घोषणा करत नाही तर त्याची अंमलबजावणी करतो आणि बांधावरच्या शेतकऱ्यांचा विचार करतो हे पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. कुठलीही निवडणूक नसताना कर्जमाफीचा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला. दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयांची थेट मदत केली. जवळपास दीड कोटी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. देवेंद्र फडणवीस तर थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन, बांधावर जाऊन त्यांचे दुःख समजून घेतात. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत केली, कर्जमाफीची मदत झाली आणि आता पंचनामे झाल्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम महायुतीचे सरकार करेल, असे बन म्हणाले.

मुंबईचे महत्त्व कुणीही कमी करत नाही, असे स्पष्ट करत  बन म्हणाले, नवी मुंबईत विमानतळ निर्माण करून मुंबईचे महत्त्व कमी केल्याचा दावा जनाब संजय राऊत करताहेत. नवी मुंबईच्या विमानतळाला तुम्ही सातत्याने विरोध केला. तुम्हाला कोस्टल रोड, मेट्रो, कारशेड, अटल सेतू आणि समृद्धी महामार्गाला विरोध करायचा होता. नवी मुंबई काही पाकिस्तान किंवा बांगलादेशात नाही. नवी मुंबईतही मराठी माणसे आणि महाराष्ट्राचेच लोक राहतात. तेथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ होत असेल तर त्यातून कुठेही मुंबईचे महत्त्व कमी होत नाही. उलट, तुम्ही मुंबईचे महत्त्व कमी करून मुंबईतल्या मराठी माणसाला कल्याण – डोंबिवलीपासून थेट खारघरपर्यंत स्थलांतरित केले. प्रत्येक बाबतीत विरोधाचा अजेंडा राबवत मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, अशी भूमिका घेतली जाते. संजय राऊत, कुणाचा बाप, आजोबा आला तरीही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार नाही आणि मुंबईचे महत्त्वही कमी होणार नाही, असे बन यांनी ठणकावून सांगितले.

संजय राऊतांनी गोरेगावमधल्या पत्रा चाळीतल्या लोकांची घरे लाटली, त्याबद्दल आधी उत्तर द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडीडी चाळीतल्या लोकांना त्याचठिकाणी हक्काची घरे दिली. त्या घरांची किंमत आज चार ते पाच कोटी रुपये आहे. 25 लाखांमध्ये चार ते पाच कोटी रुपयांच्या किमतीत घर देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी केले. देवेंद्र फडणवीस सातत्याने महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी विमानतळाचा निर्णय घेत एक मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले. उद्धव ठाकरे मात्र कॅमेऱ्यासमोर उद्योगपतींना विरोध करतात आणि त्याच उद्योगपतीच्या घरी लग्नात जाऊन नाच करणे, रेड कार्पेट टाकून त्यांचे स्वागत करणे, ही उबाठा गटाची परंपरा राहिली आहे, अशी सणसणीत टीका बन यांनी केली.

Popular Articles