spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नियमित लसीकरणापासून माता व बालक वंचित राहू नये

– नियमित लसीकरणाबाबत टास्क फोर्स समितीच्या बैठकीत घेतला आढावा

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील मनपा रुग्णालय, शासकीय व खासगी दवाखान्यांमध्ये होणाऱ्या नियमित लसीकरणापासून वंचित राहिलेल्या माता व बालकांचे लसीकरण व उपाययोजनांच्या अनुषंगाने मंगळवार (ता. ३०) शहर टास्क फोर्सची समितीची बैठक मनपा मुख्यालयातील अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत त्यांच्या सभा कक्षामध्ये पार पडली. यावेळी ज्या बालकांचे लसीकरण झालेले नाही, त्याकरिता विशेष प्रयत्न करून ते वेळीस पूर्ण करावे, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी यावेळी झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीस अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद खान,साथरोग अधिकारी डॉ गोवर्धन नवखरे,झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल वंदिले, डॉ. सुलभा शेंडे, डॉ. जयश्री चन्ने, डॉ. ख्वाजा मोईनुद्दीन, डॉ. सुनील कांबळे, डॉ. विजयकुमार तिवारी, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. गजानन पवाने, डॉ. अतीक खान, एन. यु, एच, एमचे शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम पी.एच.एन अर्चना खाडे, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत शहरातील नियमित लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला तसेच बालक, गर्भवती माता व लाभार्थ्यांपर्यंत लसीकरण सेवा अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करणे, क्षेत्रीय पातळीवरील अडचणी, जनजागृती वाढवणे व विविध विभागांमधील समन्वय अधिक बळकट करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीत शहरातील साथरोग निर्मुलनाच्या पायरीवर आहेत, आपल्या सतत प्रयत्नांमुळे हे साथरोग समूळ नष्ट होतील असे जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद यांनी यावेळी सांगितले. बैठकीत सर्वप्रथम डॉ. सरला लाड यांनी बैठकीच्या मुद्द्यांची माहिती दिली. त्यानंतर डॉ. साजीद यांनी झोननिहाय नियमित लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेत माहिती दिली. त्यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे शहरातील प्रत्येक झोनअंतर्गत असलेली नियमित लसीकरणाची स्थिती मांडली. नवजात बालकांपासून ते गरोदर मातांना विविध प्रकारचे लसीकरण केले जात असून, या लसींपासून कुणीही माता आणि बालक वंचित राहू नये यावर भर देण्यात आला.

संपूर्ण शहरात नवजात बालकांचे पहिल्या दिवसांपासून इतर सर्व नियमित लसीकरण हे वेळेवर योग्यरित्या आणि शंभर टक्के व्हावे, यादृष्टीने झोनस्तरावर नियोजन आणि कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहम्मद साजीद खान यांनी झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले.

Popular Articles