Home Latest News कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजनको व एनएमआरडीएमध्ये सामंजस्य...

कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्प राबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाजनको व एनएमआरडीएमध्ये सामंजस्य करार

0

<p><strong>मुंबई&comma; दि&period; 16 &colon;-<&sol;strong> नागपूर महानगर क्षेत्रातील कोराडी &lpar;ता&period;कामठी&rpar; या ठिकाणी पर्यावरणीय पर्यटन स्थळ &lpar;ईकोटुरिझम&rpar; विकसित करण्यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण &lpar;एनएमआरडीए&rpar; आणि महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड &lpar;महाजनको&rpar; यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला&period; या करारानुसार पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड या कंपनीची 232&period;64 हे&period; आर&period; जागा नागपूर प्रदेश विकास प्राधिकरणाला 30 वर्षाच्या भाडे करारावर प्रतिवर्ष 1&sol;- रूपये भाडेपट्टयावर हस्तांतरीत करण्यात येणार आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे&comma; उपमुख्यमंत्री अजित पवार&comma; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे&comma; नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ&comma; मुख्य सचिव राजेशकुमार&comma; अपर मुख्य सचिव &lpar;नवि-१&rpar; असिमकुमार गुप्ता&comma; उर्जा विभागाचे अपर मुख्य सचिव आभा शुक्ला&comma; मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे&comma; महाजेनकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी&comma; नामप्रविप्राचे महानगर आयुक्त संजय मीणा आदी उपस्थित होते&period;<&sol;p>&NewLine;<p>महाजेनको कंपनीने भाडे कराराने दिलेली जागा मौजा कोराडी&comma; मौजा महादुला&comma; मौजा खापरखेड़ा&comma; मौजा नांदा &lpar;तालुका कामठी&rpar; आणि मौजा घोगली ता&period; नागपूर &lpar;ग्रामीण&rpar; या भागात व्यापलेली आहे&period; ही जमिन नैसर्गिक संसाधनांच्या सान्निध्यात असून&comma; जागतिक दर्जाचे पर्यावरणीय पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी उपयुक्त आहे&period; या उपक्रमाचा मुख्य आधार शाश्वत जलकेंद्रित क्रियाकलपांवर आहे&period; नॉन-मोटरायइड बोटिंग &lpar;पॅडल बोट्स&comma; कायाक्स&comma; कॅनू&rpar;&comma; पर्यावरणपूरक शिकारा आणि फ्लोटिंग डेक राइड्स&comma; फ्लोटिंग प्लॅटफॉर्मवरून पक्ष्यांचे निरीक्षण&comma; निसग पर्यटन हे उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येणार आहेत&period;<&sol;p>&NewLine;<p>प्राधिकरणाला दिलेली जमिन ही जमीन नागपूरच्या महत्त्वाच्या शहरी आणि नैसर्गिक संसाधनांच्या जवळ असल्यामुळे&comma; जागतिक दर्जाचे पर्यावरण पर्यटन स्थळ म्हणून तिचा विकास केला जाणार आहे&period; हा उपक्रम पर्यटन उद्योगास चालना देईल&comma; स्थानिक लोकांना रोजगाराच्या नविन संधी देईल व परिसराचा सामाजिक-आर्थिक विकास सशक्त करेल&comma; सदर प्रकल्प उभारणीत पर्यावरण संरक्षणाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येईल&comma; असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले&period;<&sol;p>&NewLine;<p><strong>सामंजस्य कराराचे तपशील<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p>• <strong>कराराची मुदत&colon;<&sol;strong> सुरुवातीला 30 वर्षे&comma; वार्षिक केवळ 1 रुपये भाडे&comma; व त्यानंतर वाढीव मुदतीचा पर्याय उपलब्ध<&sol;p>&NewLine;<p>• <strong>महाजेनकोचे अधिकार&colon;<&sol;strong> सध्याच्या थर्मल पॉवर स्टेशन आणि सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांच्यावर पूर्ण मालकी व नियंत्रण कायम राहणार&period;<&sol;p>&NewLine;<p>• <strong>प्राधिकरणाचे अधिकार&colon;<&sol;strong> तलावाच्या जलपृष्ठभागाचा वापर फक्त पर्यावरण पर्यटन प्रकल्पासाठी करण्याचे विशेष हक्क एनएमआरडीएला दिले जातील&period;<&sol;p>&NewLine;<p>• महाजेनकोच्या संचालक मंडळाने या प्रस्तावास मान्यता दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version