spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लक्ष्मीनारायण मंदिरच्या मुख्य रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य

सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :- तीर्थक्षेत्र अंबाळा येथील तेली समाज धर्मशाळेपासून लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंतचा रस्ता चिखलाने माखला आहे. नियमित पावसाच्या जोर वाढल्याने रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्याचा मोठ्या प्रवाहामुळे भेगा पडल्या असून त्याचे रूपांतर मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये झाले आहे. येथे नवीन रस्ता तयार करण्यात या, अशी मागणी जोर धरत आहे.

अंबाळा येथील लक्ष्मीनारायण मंदिरात दर्शनासाठी दूरवरून लोक दररोज येतात. ६ व ७ ऑक्टोबर ला येथे २ दिवसीय शरद पौर्मिमेचा मोठा उत्सव आहे. तसेच अस्थी विसर्जनासाठी हे क्षेत्र प्रसिद्ध आहे. मात्र, या स्थळापर्यंत यावयाचा रस्ता खस्ताहाल झालेला आहे. गावातील नागरिकांच्या वाहतुकीसाठीही हाच रस्ता आहे. अंबाळा हे तीर्थक्षेत्र असतााही, या रस्त्याच्या बांधकामासाठी निधीची तरतूद करून व वित्यमंत्री आशीष जयस्वाल यांचे हस्ते भूमिपूजन होऊन सुद्धा कामाची सुरुआत झालेली नाही. माहीतीनुसार या रोडला अद्याप ही प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याचे समजते. मंदिराचे विश्वस्त नारायण अग्रवाल, अड. संजीव खंडेलवाल, पुरुषोत्तम चोपकर सहित राजाराम देशमुख, गजानन गुंडूकवार, कृष्णा आस्टनकर, पुजारी भुजाडे यानी चिखलाने माखलेला रस्ता अंबाळा येथील तेली समाज धर्मशाळेपासून लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंतचा नवीन रस्ता तय्यार करण्याची मांगनी वित्यमंत्री आशीष जयस्वाल कड़े केली आहे.

अंबाळा येथे विशेष रस्ता अनुदान निधीतून ६७ लाख ६० हजार रुपये खर्च करून ४२५ मीटरचा सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला होता. निधी अपुरा पडल्याने तेली समाज धर्मशाळा ते लक्ष्मीनारायण मंदिरापर्यंतचा रस्ता शिल्लक राहिला आहे. लक्ष्मी नारायण मंदिर येथे कोजागीरी, दिवाळी , कार्तिक पोर्णिमा, रामनवमी, रामजानकी विवाह असे ५ मोठे उत्सव होतात. तसेच इतर ८ उत्सव असे एकूण १३ उत्सव होतात. या व्यतिरिक्त हा रस्ता लक्ष्मीनारायण मंदिर येथून गडमंदिराला जाणा-या मोठ्या पायऱ्याला जोडतो. रस्ता खराब असल्याने लोक जाने टाळतात.

Popular Articles