– जिल्ह्यात हजारोच्या संख्येने दिली विद्यार्थ्यांनी परिक्षा
तिरोडा :- हर घर सविधान अभियान अंतर्गत समाज कल्याण विभाग गोंदिया ,संविधान मैत्री संघ गोंदिया व जिल्ह्यातील शाळेच्या संयुक्त विद्यमानाने संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षा 2025 चे सर्व जिल्ह्यातील शाळांमध्ये आयोजन 5 आक्टोबरला करण्यात आले होते.
तिरोडा तालुक्यातील 16 केंद्रा मधील 901 विद्यार्थ्यांनी संविधान गौरव परीक्षा दिली. संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे यासाठी ही परीक्षा सर्वत्र जिल्ह्यातील शाळेमध्ये आयोजित केली होती.
संविधानाचे 75 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या प्रतियोगिता परीक्षेमध्ये 60 पर्यायवाचक प्रश्न तर 15 वर्णनात्मक प्रश्न असे एकूण 75 पश्नाला 100 गुण होते. जिल्ह्यात व तालुक्यातील सर्व शिक्षक ,परिक्षा आयोजक, स्वयंसेवक यांनी उत्तमरित्या आपले कार्य करुन योग्य रित्या परिक्षा पार पडली .




