spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मनपा आयुक्तांनी केली भांडेवाडीतील नव्या घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी

– भूमी ग्रीनद्वारे लवकरच ‘ड्रायरान’ला सुरुवात

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेद्वारा भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील दहा एकर जागेवर भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीद्वारे उभारण्यात आलेल्या नवीन घनकचरा कचरा प्रक्रिया केंद्राची मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी शनिवारी (ता.२९) पाहणी केली. प्रकल्पाची उभारणी अंतिम टप्प्यात असल्याने पुढील १५ दिवसात सर्व तयारी पूर्ण करून लवकरात लवकर ड्रायरन ला सुरुवात करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत, उपायुक्त राजेश भगत, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहाय्यक आयुक्त विकास रायबोले, कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेश दुफारे, राजेंद्र राठोड, विजय गुरूबक्षाणी, सल्लागार जगताप, सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीचे विजय टिळेकर, पंकज पासनकर, श्रीकृष्ण दीक्षित, झिग्मा कंपनीचे सुरेश, मनपाचे विभागीय झोनल स्वच्छता अधिकारी लोकेश बासलवार, रोहिदास राठोड, नंदकिशोर शेंडे, यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रमुख्यामे उपस्थित होते.

पुणे येथील भूमी ग्रीन प्रा.लि. कंपनीच्या माध्यमातून भांडेवाडी डम्पिंग यार्ड परिसरातील पाचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. या घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या उभारणी चे कार्य अंतिम टप्प्यात असून, उर्वरित किरकोळ कामे त्वरित पूर्ण करून प्रक्रिया केंद्र लवकरच पूर्ण क्षमतेने कार्य सुरू करणार आहे. याद्वारे प्रक्रिया केल्या जाणाऱ्या कचऱ्यातून सेंद्रिय खत निर्मिती व आरडीएफ तयार केले जाणार आहे. त्यामुळे सुसबिडी आणि भूमी ग्रीन प्रा.लि. द्वारे जवळपास तेराशे टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करणे शक्य होणार आहे.

दहा एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या घनकचरा प्रक्रिया केंद्राच्या पाहणी दरम्यान मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी उर्वरित कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसेच केंद्रासाठी लागणाऱ्या विद्युत व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आदी विविध सुविधांची पाहणी केली. याशिवाय प्रकल्पाकडे ये-जा करण्यासाठी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे. प्रकल्पा जवळचा साचलेला घनकचरा हा दुसरे बाजूला हलविण्यात यावा, प्रकल्पाची व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी लवकरात लवरकर ड्रायरान करून घ्यावे तसेच पुढील १५ दिवसात सर्व तयारी पूर्ण करून घेण्याच्या सूचना आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आयुक्तांनी भांडेवाडीतील एकीकृत शहरी घनकचरा प्रकल्प (सुसबिडी ) येथील प्रकल्पाला भेट देत प्रकल्पाच्या सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली. या ठिकाणी दररोज ८०० टन कचरा संकलित केला जात असून, त्यांनी प्रकल्पाच्या कार्य पद्धतीबद्दल नाराजी व्यक्त करीत आवश्यक त्या निर्देशांचे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.