किशोर साहू, मौदा, ता.२०:- रक्षा बहुउद्देशीय शिक्षण संस्था मार्फत इलाईट पब्लिक स्कूल चाचेर येथे मशरूम फार्मिंग मार्गदर्शन व प्रशिक्षण याचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.या प्रसंगी मार्गदर्शिका म्हणून देवेश्री कोरडे यांना बोलण्यात आले होते. त्यांनी मार्गदर्शनात मशरूम फार्मिंग बद्दल विविध बाबीवर मार्गदर्शन केले.तसेच शासकीय योजना बद्दल माहिती दिली.याप्रसंगी शाळेचे संचालक राष्ट्रपाल गजभिये यांनी देवश्री कोरडे यांचे शाळेच्या वतीने आभार मानले. कार्यक्रमाला महिला बचत गट, शाळेतील शिक्षक, शिक्षिका , सीआरपी, सह नागरीक सहभागी होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुर्गाप्रेम बहुउद्देशीय संस्था सचिव गुप्तपाल गजभिये यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.








