spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

माय भारत केंद्राच्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न

तिरोडा :- युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय भारत सरकार अंतर्गत कार्यरत माय भारत केंद्र गोंदिया मार्फत ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्तरावर क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार 29 व 30 डिसेंबर रोजी तिरोडा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन गुलाबटोला ज्यू.कॉलेज लाखेगाव च्या भव्य पटांगणावर क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. 100 मीटर धावणे,कबड्डी ,खोखो,गोळा फेक आदी स्पर्धांचा यामध्ये समावेश होता. समारोपीय कार्यक्रमात विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शुभम बिंझाडे होते.प्रमुख अतिथी म्हणून बाळू राऊत, संजय गोखले, राजेश गोखले, उमेश राऊत होते.

मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये सहयोग युवा मंडळ केसलवाडा प्रथम, आझाद युवा मंडळ विहिरगाव ने द्वितीय क्रमांक पटकाविला. गोळा फेक पुरुष स्पर्धेत अभिषेक राघोर्ते प्रथम, शुभम रहांगडाले याने द्वितीय क्रम प्राप्त केला. 100 मीटर धावणे स्पर्धेत अभिषेक राघोर्ते प्रथम, शुभम रहांगडाले याने द्वितीय क्रम प्राप्त केला. स्पर्धेत तिरोडा तालुक्यातील 11 युवा मंडळाचे सभासद सहभागी झाले होते..

जिल्हा युवा अधिकारी सुशील भड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महेश कनपटे,नितीन डोहळे,मोहन तितीरमारे,रघुनाथ कनपटे,शिल्पा हिंगे ,विकी वहिले,गणेश पडोळे व केसलवाडा /लाखेगाव येथील सर्व युवा मंडळ सदस्य व खेळाडू यांनी परिश्रम घेतले.

Popular Articles