– मोबाइलच्या युगात मैदानी खेळांचे महत्त्व अधिक : आमदार रहांगडाले
तिरोडा :- स्थानिक मेरिटोरियस पब्लिक शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी त्रिदिवसीय ‘जोश’ क्रीडा स्पर्धांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. स्पर्धांचे उद्घाटन आमदार विजय रहांगडाले ,नवनिर्वाचित नगराध्यक्ष अशोक असाटी, थानेदार अमित वानखेड़े,संचालक मुकेश अग्रवाल, रानी अग्रवाल, प्राचार्य प्रफुल तिवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना आमदार रहांगडाले म्हणाले की, आजच्या मोबाइलच्या युगात मुले स्क्रीनकडे अधिक झुकत आहेत. अशा वेळी मैदानी खेळ शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि आत्मविश्वास वाढवतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने रोज मैदानाशी नाते जोडले पाहिजे.तिरोडा स्तरावर असून सुध्या मेरिटोरियस शाळा विद्यार्थिच्या यशस्वी साठी मोठ्या शहरातील शाळे पेक्षा अव्वल आहे असे ते म्हणाले.

या क्रीडा महोत्सवात धावणे,खो-खो, क्रिक्रेट, फुटबॉल, थ्रो बॉल, रिले ,डशबोल, टग ऑफ वार, सैक रेस,आदी विविध क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.त्रि दिवसीय क्रीड़ा सोहळात दुसऱ्या दिवसी व तिसऱ्या दिवसी ही प्रमुख पाहुने म्हणून गट शिक्षणाधिकारी गिरिपुनजे, पोलिस निरीक्षक वानखेड़े, पत्रकार नीलकंठ साकुरे उपस्थित होते विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धांना रंगत आणली.पालकानी ही क्रीड़ा स्पर्धत भाग घेवून प्रतिसाद दिला
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य प्रफुल तिवारी क्रीडा शिक्षक मुकेश शेंडे, संकेत मोहोड़ व सर्व शिक्षकवृंदाने विशेष परिश्रम घेतले. पालकांची उपस्थिती आणि विद्यार्थ्यांचा जल्लोष यामुळे संपूर्ण शाळा परिसर क्रीडामय वातावरणाने भारावून गेला. अंतिम दिवसी समापन कार्यक्रम वरिष्ट नागरिक याचा उपस्थितित फ्लैग पुढील वर्ष क्रीड़ा स्पर्धा साठी संचालक याचा स्वधीन करण्यात आला.








