spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

माई ग्रुप ला मिळाला द प्राइड ऑफ रिअल इस्टेट लँड डेव्हलपर ऑफ द इयर 2025 पुरस्कार

नागपूर :- भारतातील रिअल इस्टेट क्षेत्रातील नामांकित राष्ट्रीय संस्था नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल ऑफ विदर्भ (नरेडको) यांच्या वतीने 20 सप्टेंबर रोजी नागपूरच्या रामदासपेठ येथील हॉटेल सेंटर पॉईंट येथे आयोजित भव्य सोहळ्यात नागपूरची सर्वात विश्वासार्ह कंपनी माय असेट्स इन्फ्रा (माई ग्रुप) च्या माय सिटी या ड्रीम प्रोजेक्टला 25 एकरपेक्षा जास्त कॅटेगरीमध्ये The Pride of Real Estate Land Developer of the Year 2025 Award ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार माई ग्रुपचे मुख्य व्यवस्थापक डॉ. मोतीलाल चौधरी यांना मुंबईचे प्रसिद्ध बिल्डर निरंजन हिरानंदानी आणि महाराष्ट्र राज्याचे मंत्री व भंडारा-वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

2016 पासून माय ॲसेट्स इन्फ्रा (माई ग्रुप) यांनी नागपूरमधील वर्धा रोड, हुडकेश्वर रोड, हिंगणा रोड आणि अमरावती रोड या ठिकाणी प्लॉट्स, फ्लॅट्स आणि फार्म लँड अशा तिन्ही प्रकारच्या प्रकल्पांची उभारणी किफायतशीर दरात केली आहे. ग्राहकांनी घेतलेल्या प्लॉट्सचे भाव मागील तीन वर्षांत दुप्पट वाढले आहेत. त्यांच्या विकसित माय सिटी या स्वप्न प्रकल्पाचे क्षेत्रफळ सुमारे 35 एकर असून, आउटर रिंग रोडलगत मौजा पांजरी येथे स्थित आहे. हा प्रकल्प एनएमआरडीए, रेरा सॅंक्षण, आरएल अशा सर्व मान्यता प्राप्त करून आधुनिक सुविधांसह पूर्ण विकसित करण्यात आला आहे. या उत्कृष्ट प्रकल्पाला नरेडको तर्फे हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. डॉ. चौधरीना या आधीही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

मार्च 2023 मध्ये अमेरिकन ईस्ट कोस्ट युनिव्हर्सिटी कडून मुंबई येथे मानद डॉक्टरेट पदवी

सप्टेंबर 2023 मध्ये महाराष्ट्र उद्योग सन्मान, नाशिक

सप्टेंबर 2024 मध्ये ग्लोबल एक्सीलन्स फोरम, नवी दिल्ली तर्फे इंडियन आयकॉन अवॉर्ड

24 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली येथे भारत सन्मान 2025 या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री आशीष जयस्वाल, राज्यमंत्री पंकज भोयर, प्रसिद्ध अभिनेत्री झरीन खान, बिल्डर निरंजन हिरानंदानी, माजी खासदार कृपाल तुमाने, भाजपा नेते विकी कुकरेजा आणि इतर मान्यवर विदर्भासह महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील तसेच तेलंगणातील अनेक बिल्डर व डेव्हलपर्स यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बिल्डर, आर्किटेक्ट, डेव्हलपर्स यांची निवड निर्णायक मंडळाने पारदर्शक पद्धतीने केली आणि त्यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास सुमारे 500 लोकांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे संचालन प्रसिद्ध चित्रपट व दूरदर्शन कलाकार अमन वर्मा यांनी केले. पुरस्कार स्वीकारताना डॉ. मोतीलाल चौधरी यांनी या यशाचे श्रेय आपल्या आई- वडील, गुरुजनांचे आशीर्वाद, मुलांचे सहकार्य, सेल्स टीम, ऑफिस स्टाफ, डेव्हलपमेंट टीम, समाधानी ग्राहक, नातेवाईक आणि मित्रपरिवार यांना दिले. तसेच आयोजक नरेडकोचे चेअरमन घनश्याम ढोकणे, अध्यक्ष कुणाल पडोले आणि साहिल तिवारी व त्यांच्या टीमचे मनःपूर्वक आभार मानले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.