spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रधानमंत्री आवास योजना – 2.0 अंतर्गत नवीन घरकुल नोंदणीसाठी ऑनलाइन अभियान

 

खापा, ३० : खापा शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजना 2.0 कार्यनवीत केलेली असून शहरामध्ये योजनेचा प्रचार व प्रसार करणे सुरू आहे. दि. 29 जुन रोज मंगळवार ला नवीन घरकुल नोंदणीसाठी ऑनलाईन नोंदणी अभियान तसेच शिबिराचे आयोजन नगरपरिषद कार्यालयात करण्यात आलेले आहे. सदर शिबिरामध्ये खापा शहरातील लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला असून लाभार्थ्यांचे फॉर्म ऑनलाईन करण्यात आलेले आहे.

नगरपरिषद तर्फे घरोघरी सर्वेक्षणाचे काम सुरू असून गरीब व गरजू व्यक्तींना या योजनेच्या लाभ मिळावा यासाठी नगरपरिषद प्रशासन कटिबद्ध असल्याचे खापा शहराचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री धनंजय सरनाईक यांनी याप्रसंगी सांगितले.

वैभव गोळे प्रशासकीय अधिकारी, मोनेश रेवतकर CLTC अभियंता, अनिल कोंडे नगर अभियंता, सागर लांडे रचना सहाय्यक, जयंत वानखेडे संगणक अभियंता, अनिकेत शिंदे कर अधिकारी, अभिषेक पोतले पाणीपुरवठा अभियंता, राहुल बावनकुळे शहर समन्वयक, ज्ञानेश्वर सोनवणे कर अधिकारी, प्रमोद लकडकर सह्य प्रकल्प अधिकारी, अनुप लखपती, कपिल निनावे, हरीश कोल्हे, विजय ठेंगळी, रोशन अंतूरकर, राजू शिंदे, लिलेश रेवतकर, अरुण तायवाडे, संजय महतो व इतर कर्मचारी उपस्थित होते

Popular Articles