spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

नागपूरकरांनी केला वृक्षारोपणाचा महासंकल्प

– शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघातून मोहिमेला प्रारंभ

– महापौर, आमदार व नगरसेवकांसह नागरीकांनी घेतली वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा

नागपूर :- पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरात सुरू केलेल्या वृक्षारोपणाच्या महामोहिमेची सुरूवात महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. त्याचप्रमाणे नागपूर शहरातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार विकास ठाकरे, आमदार संजय भेंडे यांच्यासह उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी आमदार अनिल सोले व प्रसिध्द क्रिकेटपटू प्रफुल्ल हिंगे यांच्यासह झोन सभापती, प्रभागातील सर्वपक्षीय नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शहरातील विविध भागांमध्ये या मोहिमेची सुरूवात करण्यात आली.

पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहराची स्वच्छता व संवर्धनासाठी तसेच शहराचे हिरवे आच्छादन वाढविण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनापासून (ता. 5 जून) ते जागतिक योग दिन (ता. 21 जून) पर्यंत मनपातर्फे विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. मनपाचा वृक्षारोपण महामोहिमेचा उपक्रम या साखळीतील एक भाग आहे. शहराचे हिरवे आच्छादन वाढविण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. वाढते तापमान व पर्यावरणात होणार्या बदलांचा सामना करण्यासाठी झाडांची संख्या वाढविण्यासाठी महापौर निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम हाती घेतला आहे.

नागपूर शहरातील सहा विधानसभा मतदारसंघातून या मोहिमेची सुरूवात करण्यात आली. धंतोली झोनमधील सुयोगनगर उद्यानात महापौर निता ठाकरे व आमदार संजय भेंडे यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा विशेष समितीच्या सभापती दर्शनी धवड, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी उपमहापौर संदीप जाधव, नगरसेविका विशाखा मोहोड, नगरसेवक संदीप गवई, नगरसेविका पूजा भूगावकर, नगरसेवक रितेश गावंडे, नगरसेवक रमेश भंडारी,  अंकित चौधरीसह इतर नगरसेवक सहाय्यक आयुक्त  प्रमोद वानखेडे यांच्यासह परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. यावेळी आमदार संजय भेंडे यांचा नरेंद्रनगर नागरिक मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वश्री भूषण केशकर, सुरेश रेवतकर, संजय खोरगडे, संजय सिन्हा,स्वाती लांजेवार,  रंजना धकाते, चैताली वानखेडे, छाया पाराशर, अमित पुजारी, राजू पागोरे बिट्टू चौहान उपस्थित होते.

स्वच्छतेसाठी संकल्प करावा- महापौर

यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे यांनी केवळ दिवसासाठी नव्हे तर वर्षभर शहराच्या स्वच्छतेसाठी तसेच संवर्धनसाठी विविध उपक्रमांमध्ये नागरिकांनी मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. त्याचप्रमाणे रेन हार्वेस्टिंग व सोलरचा अधिकाधिक वापर करावा, असे आवाहन केले.

एक झाड घरासमोर लावा – आमदार संजय भेंडे

मनपाची ही मोहिम स्तुत्य असून प्रत्येकाने एक झाड आपल्या घरासमोर लावण्याचा संकल्प करावा, असे आवाहन आमदार श्री. संजय भेंडे यांनी केले. त्याचप्रमाणे प्लास्टिकच्या वापर कमीतकमी करावा, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी पाण्याचा वापर नियंत्रित करावे तसेच भूजल पातळी वाढविण्यासाठी पाणी जमीनीत मुरण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पर्यावरण तज्ज्ञ श्री. स्वानंद सोनी यांनी पाण्याचा वापर आवश्यक तेवढाच करावा व विनाकारण पाण्याची नासाडी करू नये, असे आवाहन केले. आता आपण पाण्याचा वापर काळजीपूर्वक केला नाही तर पुढील पिढीला त्याचा फटका सहन करावा, असे इशाराही त्यांनी दिला.

कापडी पिशव्यांचे वाटप

यावेळी वृक्षसंवर्धन व स्वच्छेतेसाठी उपस्थितांनी शपथ घेतली. यावेळी प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करावा, यासाठी यावेळी महिलांना कापड्याच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नरेंद्रनगर नागरिक मंडळाचे स्वयंसेवक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नंदीग्राममध्ये वृक्षारोपण

पर्यावरण संवर्धन पंधरवड्याअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून महापौर निता ठाकरे यांच्याहस्ते वाठोडा येथील नंदीग्राम येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सत्तापक्ष नेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, वैद्यकीय व आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे, नेहरूनगर झोन सभापती सीमा ढोमणे, नगरसेवक अरुण हारोडे, नगरसेविका शारदा बारई यांच्यासह मुख्य अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त गणेश राठोड, विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, मुख्य स्वछता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त  विकास रायबोले, कार्यकारी अभियंता अश्विनी येलचेटवार, उपभियंता राजीव गौतम यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी कर्मचारी, नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते.

Popular Articles