– एड्युक्रॉन प्रा.लि.ला 5G इनोव्हेशन हॅकाथॉन 2025 मध्ये दुसरा क्रमांक
—सुरक्षित डिजिटल ताबा व्यवस्थेत नवे युग
नवी दिल्ली :- नागपूर स्थित एड्युक्रॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने 5G इनोव्हेशन हॅकाथॉन 2025 मध्ये स्टार्टअप / MSME / R&D ऑर्गनायझेशन या श्रेणीत दुसरा क्रमांक (फर्स्ट रनर-अप) पटकावला आहे. ही स्पर्धा भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने आयोजित केली होती. विजेत्यांना केंद्रीय संचार राज्यमंत्री डॉ.सी. एन.अश्वथ नारायण पेम्मासनी यांनी इंडिया मोबाइल कॉंग्रेस 2025 दरम्यान सन्मानित केले.
देशभरातून आलेल्या 1000 हून अधिक नवकल्पनांमध्ये, एड्युक्रॉनचा IoT आधारित स्मार्ट कस्टडी व ट्रान्सपोर्ट सिस्टम प्रकल्प नावारूपास आला. या प्रकल्पाचे नेतृत्व आनंद वर्धन तिवारी आणि प्रशांत शाह यांनी केले असून, तो विश्वेश्वरैया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VNIT), नागपूर यांच्या सहकार्याने साकारला गेला. प्रकल्पाला नागपूर रेंजचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील (IPS) यांचे मार्गदर्शन लाभले. ही अभिनव प्रणाली सध्या मुख्यमंत्र्यांच्या 150 दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत मौदा पोलीस ठाण्यात मुद्रेमाल व्यवस्थापन प्रणाली (Muddemal Management System) म्हणून प्रायोगिक अंमलबजावणी साठी सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे जप्त वस्तूंचे सुरक्षित, डिजिटल व पारदर्शक व्यवस्थापन शक्य होईल. हीच तंत्रज्ञान प्रणाली परीक्षा प्रश्नपत्रांच्या सुरक्षित साठवण आणि वाहतुकीसाठी देखील वापरली जाऊ शकते, ज्यामुळे प्रश्नपत्र गळती किंवा फेरफार रोखता येईल. एड्युक्रॉन प्रा.लि. ही नागपूरची अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनी असून, ती डिजिटल इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकटी देत आहे.


